दुबई, 22 फेब्रुवारी (हिं.स.)अल हाझेमविरुद्ध क्रिस्टियानो रोनाल्डोने दोन गोल करून अल नासरला सौदी प्रो लीगमध्ये अव्वल स्थान मिळवून दिले. या दोन गोलमुळे पोर्तुगीजच्या या फुटबॉलपटूने अनेक विक्रमांना गवसणी घातली. या गोलमुळे ४१ वर्षीय क्रिस्टियानो रोनाल्डो फुटबॉलच्या इतिहासात ३० वर्षांचा झाल्यानंतर ५०० गोल करणारा पहिला फुटबॉलपटू ठरला आहे. ज्यामुळे त्याच्या एकूण कारकिर्दीतील गोलची संख्या आता ९६४ झाली आहे. आणि १,००० गोलच्या टप्प्यापासून तो केवळ 36 गोल दूर आहे.
४१ वर्षीय पोर्तुगालच्या फुटबॉलपटूने सामन्याच्या १३ मिनिटांतच यजमान संघाला आघाडी मिळवून दिली. किंग्सले कोमनने पेनल्टी क्षेत्रात रोनाल्डो पास दिला. आणि जिथे त्याने उजव्या पायाने स्पर्श केला आणि नंतर डाव्या पायाचा प्रयत्न पुन्हा कोपऱ्यात केला. ऑफसाइडसाठी VAR तपासणीनंतर हा गोल देण्यात आला. जो रोनाल्डोचा ३० वर्षांचा झाल्यापासून ५०० वा गोल होता.
जानेवारीच्या ट्रान्सफर विंडोमध्ये फुटबॉलपटूंना करारबद्ध न करण्यावरून क्लबशी झालेल्या वादामुळे या महिन्याच्या सुरुवातीला रोनाल्डोने दोन लीग सामने गमावले होते. सामन्यानंतर रोनाल्डो म्हणाला, मी अनेकदा म्हटल्याप्रमाणे, मी सौदी अरेबियाचा आहे. हा असा देश आहे ज्याने माझे, तसेच माझ्या कुटुंबाचे आणि मित्रांचे स्वागत केले. मी येथे आनंदी आहे आणि येथून खेळणे सुरु ठेवू इच्छितो.
—————
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे
