पुणे 8 जानेवारी (हिं.स.) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे येत्या 17 जानेवारी रोजी पदवी प्रदान समारंभाचे आयोजन केले जाणार आहे. यावर्षी तब्बल १ लाख १७ हजार विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राचे वितरण केले जाणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
विद्यापीठातर्फे वर्षातून दोन वेळा पदवीप्रदान समारंभाचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांना परदेशातील शिक्षणासाठी पदवी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते त्यामुळे पदवी प्रमाणपत्र लवकरात लवकर मिळावे अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा असते.अखेर 17 जानेवारी रोजी विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ होणार आहे. त्यामुळे पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना लवकरच पदवी प्रमाणपत्र प्राप्त होणार आहे.तसेच 70 ते 80 विद्यार्थ्यांना गोल्ड मेडलचे वितरण करण्यात येणार असून त्यात एकट्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे 17 विद्यार्थी आहेत.
हिंदुस्थान समाचार
