cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Regional > साताऱ्यात साकारली साहित्य संमेलन विशेष सजावट
Regional

साताऱ्यात साकारली साहित्य संमेलन विशेष सजावट

CliQ INDIA
Last updated: August 29, 2025 6:34 am
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE

सातारा, 28 ऑगस्ट (हिं.स.)। अभिजात मराठी भाषेचा उत्सव असलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीतील एक महत्त्वाचे पान. पुढील वर्षी साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनाच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील खण आळीतील पाठकजी कुटुंबाने ज्ञानगणेश साहित्य संमेलन विशेष ही सजावट घरगुती गणपतीसमोर साकारली आहे. ‘संगीत गणेश’, ‘क्रीडा गणेश’, ‘अर्थ गणेश’, ‘वारली गणेश’ आदी संकल्पनांवर यापूर्वी साकारल्या असून, हे सजावटींचे सलग दहावे वर्ष आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, मसापचे कार्यवाह शिरीष चिटणीस, मसाप शाहुपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र माने यांनी या सजावटीचे गुरुवारी (ता. २८) औपचारिक उद्घाटन केले.

सजावटीमध्ये काय ?

सजावटीमध्ये ग्रंथदिंडी, साहित्य संमेलन मंडप, पुस्तकांचे स्टॉल, कविकट्टा आणि इतर विविध परिसंवादाची व्यासपीठे यांची लघुरूपे साकारली आहेत. आतापर्यंत झालेल्या ९८ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची छायाचित्रेही एकत्र करण्यात आली आहेत. साहित्य संमेलन साताऱ्यात होत असल्यामुळे साताऱ्यातील प्रमुख लेखकांच्या पुस्तकांची मुखपृष्ठे, साताऱ्यातील लेखक-कवींची यादी, साताऱ्यात झालेल्या साहित्य संमेलनांमधील अध्यक्षांचे विचार, साहित्य संमेलनावरील पुस्तकांची मुखपृष्ठे, संमेलन अध्यक्षांची माहिती देणारी दिनदर्शिका आदी गोष्टीही सजावटीमध्ये मांडण्यात आल्या असून, प्रस्तावित संमेलनाची निमंत्रण पत्रिका आणि संमेलनानंतर होणाऱ्या स्मरणिकेचे संकल्पचित्रही साकारले आहे. साहित्य संमेलनाची ही नगरी साताऱ्यातील ज्येष्ठ कलाशिक्षक शेखर हसबनीस आणि त्यांची कन्या श्वेता यांच्या प्रयत्नांतून साकारली आहे. तर, ९८ संमेलनाध्यक्षांच्या छायाचित्रांच्या संकलनाचे अतिशय आव्हानात्मक काम साताऱ्यातील ज्येष्ठ छायाचित्रकार नरेंद्र जाधव यांनी केले आहे. साहित्यिक आणि इतर संदर्भांसाठी श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालयाच्या सेवकवर्गाचे सहकार्य लाभले असून, चंद्रकांत चिंचकर आणि सारंग किरपेकर यांनी डिझाईन आणि डीटीपी साह्य केले आहे. संमेलनविषयक पुस्तकांसाठी पुण्याचे ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र गुर्जर आणि डोंबिवलीचे ज्येष्ठ लेखक-समीक्षक रविप्रकाश कुलकर्णी यांची मोलाची मदत झाली आहे.

अभिजात मराठीसाठी प्रयत्न

सजावटीबद्दल बोलताना शिरीष चिटणीस यांनी पाठकजी कुटुंबाच्या उपक्रमाचे कौतुक केले. ‘‘या प्रकारच्या उपक्रमातून अभिजात मराठी भाषेची गोडी लावण्यासाठी निश्चित प्रयत्न होतील. साताऱ्यातील संमेलन यशस्वी होण्यासाठी असे उपक्रम व्हावेत,’’ असे चिटणीस यावेळी म्हणाले.

मराठी साहित्य संमेलनाच्या वातावरण निर्मितीसाठी करण्यात आलेला उपक्रम कौतुकास्पद आहे, असे डॉ. राजेंद्र माने म्हणाले.

‘‘मराठी भाषेला साहित्य संमेलनाची मोठी परंपरा आहे. ही परंपरा गणेशापुढील सजावटीच्या रूपाने मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे. मराठी भाषेची आवड आजच्या पिढीमध्ये यावी या हेतूने ही सजावट साकारली आहे,’’ असे सजावटीची संकल्पना मांडणारे ज्येष्ठ लेखक-समीक्षक पद्माकर पाठकजी यांनी सांगितले.

—————–

हिंदुस्थान समाचार / मेघा माने

You Might Also Like

आमदार राजु कारेमोरे यांचा डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल
सोलापूर – बंधाऱ्याच्या संरक्षक कठड्यांसह लोखंडी पाईप गायब
राष्ट्रीय शिक्षण धोरणातून सक्षम व सृजनशील भारत घडेल – चंद्रकांत पाटील
उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2024 प्रवेशिका सादर करण्यासाठी 28 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ | BulletsIn
नाशिक : छठपर्वा निमित्त भोजपुरी संगीताचे आयोजन

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article मुंबईतील गणेशोत्सवात पॉलीकॅबने मजबूत केले बंध
Next Article अमेरिकन कॅथोलिक शाळेत गोळीबार ; २ मुलांचा मृत्यू तर १७ हून अधिक जण जखमी
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?