मुंबई, 19 नोव्हेंबर (हिं.स.) : भारताच्या माजी पंतप्रधान भारतरत्न कै. इंदिरा गांधी यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त महानगरपालिका सभागृहातील त्यांच्या अर्धपुतळ्यास प्रमुख अभियंता ( घनकचरा व्यवस्थापन) प्रकल्प सुधीर परकाळे यांनी पुष्पहार अर्पण करुन आज (दिनांक १९ नोव्हेंबर, २०२३) अभिवादन केले.
यावेळी महानगरपालिका सहाय्यक सचिव प्रियांका देसाई उपस्थित होत्या.
हिंदुस्थान समाचार
