cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Regional > अंधेरीतील गोखले रेल्वे उड्डाणपुलाचा पहिला गर्डर यशस्वीरीत्या स्थापित
Regional

अंधेरीतील गोखले रेल्वे उड्डाणपुलाचा पहिला गर्डर यशस्वीरीत्या स्थापित

CliQ INDIA
Last updated: December 8, 2023 9:00 pm
CliQ INDIA
Share
8 Min Read
SHARE

मुंबई, 8 डिसेंबर (हिं.स.) : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासात सर्वाधिक वेगाने तयार करण्यात आलेला पूल म्हणजे गोखले पुलाचा प्रकल्प आहे. त्याचा पहिला गर्डर स्थापन करून, येत्या १५ दिवसात या पुलाची तांत्रिकदृष्ट्या सर्वाधिक आव्हानात्मक कामे पूर्ण होणार आहेत. त्यामुळे १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत गोखले पुलाची एक मार्गिका खुली करणे शक्य होईल, असा विश्वास आमदार अमीत साटम यांनी व्यक्त केला.

अंधेरीतील गोपाळ कृष्ण गोखले रेल्वे उड्डाण पूल प्रकल्पातील महत्वाचा टप्पा असलेल्या पहिला गर्डर स्थापित करण्याचे काम हे मध्यरात्रीनंतर ते पहाटे या कालावधीत पार पडले. त्यावेळी गर्डर स्थापन करण्याचा शुभारंभ आ. साटम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

या गर्डर स्थापनेवेळी आमदार ऋतुजा लटके, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उप आयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, प्रमुख अभियंता (पूल) विवेक कल्याणकर तसेच पश्चिम रेल्वेचे अधिकारी, मे. राईट्स लि. व कंत्राटदार ए. बी. इन्फ्राबिल्ट यांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

गोखले पुलासाठी गर्डर स्थापित करणे हे अभियंत्रिकी दृष्टया अत्यंत आव्हानात्मक असे काम आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनाने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार व पश्चिम रेल्वेने निर्देश केल्याप्रमाणे मे. राईट्स लि. यांच्या तांत्रिक पर्यवेक्षणाअंतर्गत हे काम प्रगतिपथावर आहे. रेल्वे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून कामाची जोखीम व तांत्रिक बाबी तपासूनच रेल्वे वाहतूक व पॉवर ब्लॉकच्या कालावधीत, रेल्वे भूभागात पहिल्या टप्प्यातील गर्डर मध्यरात्री रेल्वे भागात यशस्वीपणे स्थापित करण्यात आला. नियोजित ७५ टक्के अंतर कापून तेथे गर्डर स्थापित करण्याचे उद्दिष्ट गाठण्यात आज यश आले. हा महत्वाचा टप्पा पार पडल्याने उर्वरीत अंतरावर गर्डर स्थापनाही अल्पावधीत आणि सुलभतेने करता येणार आहे. तर येत्या पंधरवड्यात हा गर्डर १४ मीटर उत्तरेला सरकवणे आणि नंतर तो ७.५ मीटर खाली आणणे ही कामे नियोजित करण्यात आली आहेत.

रेल्वे परिसरातील ७.५ मीटर उंचीवरून पूल खाली आणण्यासाठी पश्चिम रेल्वेने ११ दिवसांचा ब्लॉकचा कालावधी मंजूर केला आहे. पश्चिम रेल्वेच्या विशेष ब्लॉकमध्ये दररोज रात्रीच्या वेळेतील तीन तासात सरासरी ५५० मिमी इतक्या प्रमाणात गर्डर हा खाली आणणे शक्य होईल.

या गर्डर स्थापनेवेळी आ. साटम पुढे म्हणाले की, अल्पावधीतच या पुलाचे काम वेगाने पुढे नेण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पूल विभागामार्फत अथक प्रयत्न करण्यात आले. तसेच अनेक आव्हानांचा सामना करत अतिशय विक्रमी वेळेत पहिल्या मार्गिकेचे काम वेगाने करण्यात येत आहे. पूल बांधणीच्या कामात अत्यंत वेगाने झालेल्या या कामामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेने एक नवा विक्रम प्रस्थापित केला असल्याचेही श्री. साटम म्हणाले.

उपआयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले म्हणाले की, येत्या काही दिवसात हा गर्डर उत्तर दिशेला सरकवून त्यानंतर टप्प्याटप्प्याने खाली आणण्यात येईल. हे काम तांत्रिकदृष्ट्या अतिशय आव्हानात्मक असणार आहे. त्यासाठी विशेष तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी करण्यात येईल, नियोजित उंचीवर खाली आणल्यानंतर मार्गिकेची पुढील कामे पूर्ण केली जातील, अशी माहिती महाले यांनी दिली.

प्रमुख अभियंता (पूल) विवेक कल्याणकर म्हणजे की, एखाद्या पुलाच्या कामात ७.५ मीटर उंचीवरून गर्डर विशिष्ट उंचीपर्यंत खाली आणणे, असा हा भारतातील पहिलाच प्रकल्प आहे. मुंबईची लाईफ लाईन असलेल्या रेल्वे परिसरातील भागात हा प्रकल्प राबविण्यात येत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने सर्वतोपरी काळजी घेतली असल्याची माहिती कल्याणकर यांनी दिली.

पहिल्या टप्प्यातील रेल्वे भूभागातील गर्डरचे वजन अंदाजे १२०० मेट्रिक टन इतके आहे. तर लांबी ९० मीटर असून रूंदी १३.५ मीटर इतकी आहे. गर्डरची सुट्या भागांची जोडणी पूर्ण झाल्यानंतर रेल्वे भूभागातील गर्डर स्थापित करण्याआधीची चाचणी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे पूल विभागाचे अधिकारी आणि पश्चिम रेल्वेचे अधिकारी, मे. राईट्स लि. व कंत्राटदार ए. बी. इन्फ्राबिल्ड यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली होती.

सदर कामाची गुणवत्ता व दर्जा राखण्यासाठी तसेच रेल्वे हद्दीतील काम हे रेल्वे प्राधिकरणाच्या नियमानुसार करुन घ्यावे लागते. त्यामुळे रेल्वे प्राधिकरणाच्या मागणीनुसार मे. राईट्स लि. (रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम) यांच्यामार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.

· पुलाची लांबी– रेल्वे भूभागात– 90 मीटर

· रेल्वेबाहेर– पूर्वेस 210 मीटर, पश्चिमेस– 185 मीटर

· पुलाची रुंदी– (रेल्वे भूभागात)– 13.5 मीटर

· रेल्वेच्या पूर्वेस व पश्चिमेस पोहोच रस्ते, पदपथासह- १२ मीटर (दोन्ही बाजूस)

· एकूण रुंदी– २४ मीटर

अंधेरीतील गोपाळ कृष्ण गोखले पुलाबाबत पूरक माहिती-

१. अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणा-या गोपाळकृष्ण गोखले रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पाच्या निर्मितीमध्ये सुमारे १२७५ टन वजनाचे दोन गर्डर (तुळया) स्थापन करण्याचा कामाचा समावेश आहे.

सदर गर्डरच्या भागांची (स्ट्रचरल मेंबर्स) फॅब्रिकेशन अंबाला येथील कारखान्यात करण्यात येत आहे. तयार केलेल्या सुट्या भाग (मेंबर्स) ची जुळवाजुळव (असेंब्ली), सुमारे १३-१४ मीटर उंचीवर, रेल्वे रुळाच्या पूर्व बाजूस तात्पुरत्या संरचना व्यवस्थेवर करण्यात आलेली आहे.

२. गर्डरची उभारणी करुन रेल्वे रुळावर गर्डर लॉंचींग करणे / उत्तरे कडील पहिल्या टप्प्यातील नियोजित रेषेत (Alignment) सरकवणे (Side sleeving), त्यानंतर सुमारे ७.५ मीटर खाली आणणे (lowering) अशा प्रकारे पहिल्या टप्प्यातील गर्डरची उभारणी करण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर, दुस-या टप्प्यातील गर्डरची त्याच तात्पुरत्या संरचना व्यवस्थेवर उभारणी करण्यात येईल.

३. पश्चिम रेल्वे प्रशासनाने जुना पूल पूर्णपणे तोडून दिनांक २८ मार्च २०२३ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे प्रकल्पाची जागा हस्तांतरित केली. पश्चिम रेल्वे प्रशासनाद्वारे सदर पुलाची जागा हस्तांतरित केल्यानंतर १ एप्रिलपासून पुलाच्या पुनर्बांधणीचे काम सुरु करण्यात आले.

४. गोखले पुलाच्या सुमारे १३०० टन वजनी गर्डरचे लॉंचिंग करणे, गर्डर उत्तरेकडे सरकवणे आणि पुलाचा गर्डर सरकवल्यानंतर तो ७.५ मीटर खाली आणणे, हे अत्यंत कौशल्यपूर्ण काम हे राईट्स या सल्लागार कंपनीच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे.

पहिल्या गर्डरचे काम हे अत्यंत जोखमीचे असल्याने हे काम अतिशय काळजीपूर्वक करण्याची जबाबदारी राईट्स या रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम यांस देण्यात आलेले आहे.

५. एखाद्या पुलाच्या कामात ७.५ मीटर उंचीवरून सुमारे १३०० टन वजनी गर्डर खाली विशिष्ट उंचीवर आणणे, अशाप्रकारचा हा भारतातला पहिलाच प्रकल्प आहे. या प्रक्रियेतील सर्व टप्पे अतिशय काटकोरपणे करणे, रेल्वे सुरक्षेच्या निकष इत्यादी बाबींमुळे कामाच्या प्रगतिपथावर मर्यादा येतात. त्यामुळे सदर तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीच्या बाबतीत अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे.

रेल्वेच्या साधारणपणे एक तासाच्या ब्लॉकमध्ये गर्डर फक्त १५ सेंटीमीटर इतकाच खाली आणता येईल. त्यामुळे गोखले पुलाच्या या अवाढव्य १३०० टन वजनी गर्डरकरिता ७.५ मीटर खाली उतरवण्याच्या कामासाठी लागणारा कालावधी हा अधिक असू शकतो.

अशाप्रकारचे अभियंत्रिकी दृष्ट्या आव्हानात्मक काम पश्चिम रेल्वे प्रशासनाने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार व पश्चिम रेल्वेने निर्देश केल्याप्रमाणे मे. राईट्स लि. यांच्या तांत्रिक पर्यवेक्षणाखाली प्रगतिपथावर आहे.

६. एकदा गर्डर खाली आणून स्थापन केल्यानंतर त्यावर सळया अंथरून सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्यात येईल. पुलाचे क्युरींगचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यावर मास्टिकचे काम पूर्ण करण्यात येईल.

७. दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील या पुलाच्या प्रवेश मार्गिकांचे (approach road) चे काम दुसऱया कंत्राटदारामार्फत तब्बल ८० टक्के काम देखील पूर्ण झाले आहे. नियोजनाप्रमाणे दिनांक १५.०२.२०२४ पर्यंत गोखले पुलाच्या पहिला टप्प्याचे काम पूर्ण होऊन सदर पूल हा अंशतः वाहतुकीकरीता खुला करणे अपेक्षित आहे.

८. ही सर्व कामे क्रमाने झाल्यानंतरच पूल एका दिशेच्या वाहतुकीसाठी खुला करणे शक्य होईल.

गोखले पुलासाठी विविध टप्प्यातील होणारी कामे पाहता, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनामार्फत स्पष्ट करण्यात येते की, गोखले पुलाच्या सुरक्षेसाठी कोणतीही तडजोड करण्यात येणार नाही. तसेच एकंदरीतच पुलासाठी आवश्यक असलेल्या सर्व कामांच्या पूर्ततेचा कालावधी पाहता पूलाची एका दिशेची वाहतूक खुली करण्यासाठी दिनांक १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत कालावधी अपेक्षित असल्याचे महानगरपालिका, राईट सल्लागार आणि रेल्वे प्रशासन यांच्या संयुक्त बैठकीत स्पष्ट करण्यात आले आहे.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

अनिल बाबर यांचे अचानक निघून जाणे अत्यंत वेदनादायी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मराठा समाजाची शुद्ध फसवणूक आणि दिशाभूल – अशोक चव्हाण
सातारा जिल्ह्यात आषाढी एकादशी आणि मोहरम उत्साहात साजरा | BulletsIn
दावोस आर्थिक परिषदेत महाराष्ट्राचे प्रभावी ब्रॅण्डिंग व्हावे – मुख्यमंत्री
राज्य उत्पादन शुल्क विभाग भरतीसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article सिंधुदुर्ग – अधिकाऱ्यास शिवीगाळ प्रकरणी दोघांना दंड
Next Article पंतप्रधानांनी ज्यु जनतेला दिल्या हान्नुकाच्या शुभेच्छा
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?