केंद्र शासनाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत कार्यरत राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था (NIELIT) मार्फत, महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील लक्षित विद्यार्थ्यांसाठी नि:शुल्क औद्योगिक व उन्नत कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाणार आहे. या योजनेचा उद्देश अशा विद्यार्थ्यांना कौशल्य शिक्षण देणे आहे, जे कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेऊ शकत नाहीत. पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
BulletsIn
-
प्रशिक्षण संस्था: NIELIT या केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त संस्थेमार्फत कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे.
-
प्रशिक्षण मोफत: महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील लक्षित गटातील विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण पूर्णतः नि:शुल्क दिले जाईल.
-
लक्षित जाती: ब्राह्मण, मारवाडी, राजपूत, गुजराती, कायस्थ, सिंधी, नायर, आयंगार, पाटीदार, इ. जातीतील विद्यार्थ्यांचा समावेश लक्षित गटात करण्यात आला आहे.
-
पात्रता: अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा व त्याचे कौटुंबिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
-
शैक्षणिक पात्रता: IT, Computer Science, Electronics, Telecommunication, Electrical, B.Sc, BCA, BCS, MCA, M.Sc (CS) अशा शाखांमध्ये पदवी उत्तीर्ण असलेले विद्यार्थी पात्र.
-
आवश्यक कागदपत्रे:
-
आधार कार्ड
-
रहिवासी व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र
-
जात प्रमाणपत्र (लक्षित गट दर्शवणारे)
-
उत्पन्न प्रमाणपत्र (2025-26)
-
शैक्षणिक अर्हतेची प्रमाणपत्रे
-
-
अर्ज प्रक्रिया:
-
https://mahaamrut.org.in या संकेतस्थळावर जाऊन
-
‘योजना’ टॅबमध्ये ‘NIELIT प्रशिक्षण योजना’ निवडून
-
आधार संलग्न मोबाईल नंबरने नोंदणी करावी.
-
-
अर्जाचा स्वीकार: टपाल अथवा ईमेलद्वारे पाठवलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
-
निर्णयाचे अधिकार: अर्ज स्वीकृती, नकार, निवड प्रक्रिया यावर अंतिम निर्णयाचा अधिकार ‘अमृत’चे व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे असेल.
-
संपर्क: अर्ज करताना अडचण आल्यास info@mahaamrut.org.in या ईमेलवर अथवा 9730151450 या क्रमांकावर संपर्क साधावा.
