* रुग्णांमध्ये सात बालकांचाही समावेश
अहमदनगर, २९ फेब्रुवारी : अहमदनगर जिल्ह्यात हळदीच्या कार्यक्रमातील जेवणातून २०० जणांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये सात बालकांचाही समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अकोले तालुक्यातील मवेशी करवंदरा येथील ही घटना असून, बुधवारी नवरदेवाच्या घरी आयोजित करण्यात आलेल्या हळदीचा कार्यक्रमात हा प्रकार घडला. हळदीच्या कार्यक्रमातील जेवणातून झालेल्या विषबाधानंतर अनेकांना जुलाब आणि उलटीचा त्रास जाणवल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. ज्यात, ५९ लोकांना तातडीने ग्रामीण, तर काहींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुदैवाने कोणतेही जीवितहानी झाली नसून, विषबाधा झालेल्या सर्व लोकांवर उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस देखील रुग्णालयात पोहचले.
