छत्रपती संभाजीनगर, 10 ऑगस्ट (हिं.स.)। स्वाध्याय परिवाराचे प्रवर्तक पांडुरंगशास्त्री आठवले यांची सुपुत्री धनश्री दीदी तळवलकर यांची विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भेट घेतली.
संभाजी नगरात त्यांच्या कार्यक्रमात जीवन तत्त्वज्ञानाचे विचार ऐकून सामाजिक कार्यास अनंत ऊर्जा आणि शक्ती मिळाली.
आपल्या अमूल्य वाणीतून मनुष्यांना सातत्याने मार्गदर्शन करत असलेल्या दीदींशी संवाद साधणे म्हणजे सामाजिक कार्याची नव्याने ओळखच होणे. आज राखी पौर्णिमेच्या मंगलमय प्रसंगी त्यांची सदिच्छा भेट घेऊन परमार्थिक आनंदाची अनुभूती मिळाली.
तालुकाप्रमुख विष्णू जाधव, तालुका संघटक बाळासाहेब कार्ले, शहरप्रमुख विशाल खंडागळे, बजरंग पाटील,रतन नलावडे व रोहिदास चव्हाण उपस्थित होते.
—————
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis
