नागपूर, 19 डिसेंबर (हिं.स.) – ठाण्यात तरुणीला गाडीने जाणीवपूर्वक जखमी करण्याची घटना नुकतीच काही दिवसांपूर्वी समोर आली. या घटनेत सदर पीडित तरुणीवर सर्वच स्तरातून दबाव टाकला जात असल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सदर तरुणीला न्याय मिळावा, या मागणीसाठी २८९ अनव्ये चर्चा करण्याची मागणी सभागृहात लावून धरली.
एमएसआरडीसी व्यवस्थापकीय संचालकाच्या मुलाने असा प्रकार करणे हे राज्यासाठी लांचनास्पद प्रकार आहे. त्यात तरुणीच चारित्र्यहनन केल जातंय, हे दुर्दैवी बाब आहे. या घटनेत तिघे तरुण दोषी असताना पोलिसांनी त्यांना जामीन मिळेल, अशी कलम लावल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.
एखादया स्त्रीवर अन्याय होत असताना सरकार आरोपींना पाठीशी घालतय का ? या प्रकरणात सरकार मूग गिळून गप्प बसणार आहे का ? तसं असेल तर सरकारने मोठया घोषणा करू नये असे म्हणत आज या घटनेवर चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी परिषद सभागृहात केली.
हिंदुस्थान समाचार
