cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > National > राष्ट्रपतींनी स्वीकारले महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतक महोत्सवी कार्यक्रमाचे निमंत्रण
National

राष्ट्रपतींनी स्वीकारले महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतक महोत्सवी कार्यक्रमाचे निमंत्रण

CliQ INDIA
Last updated: November 7, 2023 2:00 pm
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE
राष्ट्रपती भेट 
राष्ट्रपती भेट 
राष्ट्रपती भेट 

* उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची भेट

नवी दिल्ली, ७ नोव्हेंबर (हिं.स.) : महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांची विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे व विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतक महोत्सव कार्यक्रमाचे निमंत्रण राष्ट्रपती महोदयांना दिले. या निमंत्रणाचा तात्काळ स्वीकार राष्ट्रपतींनी केला असून या कार्यक्रमास त्या उपस्थित राहणार असल्याची माहिती विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या ६ आणि ७ नोव्हेंबर असे दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांची भेट घेतली.

महाराष्ट्र विधान परिषदेला २०२१ मध्ये १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. १९१९ च्या भारतीय कायद्यानुसार १९२१ मध्ये भारतातील पहिली विधान परिषद मुंबई प्रांतात स्थापन झाली. याचे पहिले सभापती म्हणून श्री. चंदावरकर यांची नेमणूक करण्यात आली होती. महाराष्ट्र विधान परिषदेसाठी २०२१ हे शतक महोत्सवी वर्ष होते. २०२१ मध्ये कोरोना सारखा गंभीर आजार असल्याने कोणताही कार्यक्रम आयोजित करता आला नाही. त्यामुळे यावर्षी विधान परिषदेचा शतक महोत्सव साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण महामहीम राष्ट्रपती यांना आज देणेत आले.

या शतक महोत्सवी कार्यक्रमाची पूर्व तयारी म्हणून ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वा विधान परिषदेच्या जुन्या सदस्यांसाठी व नवीन सदस्यांसाठी एक दिवसाची पूर्व तयारीची कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांचे हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील, शालेय शिक्षण मंत्री श्री दीपक केसरकर व पर्यटन मंत्री श्री मंगल प्रसाद लोढा हे उपस्थितीत राहणार आहेत.

या कार्यक्रमाला जवळपास १०० माजी सदस्य उपस्थित राहणार आहेत. तसेच विधानपरिषदेतील कामकाजासंदर्भात विविध विषयावर ५ पुस्तके करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी विधान परिषद मध्ये अनेक वर्षे काम करणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार यांच्या ५ समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

तेलंगणा : मो. अझरुद्दीन यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
कोकण विभागात 54 कौशल्य विकास केंद्र कार्यान्वीत
राजस्थान सीमेवर पाकिस्तानी घुसखोराला अटक
स्था.स्व.संस्था निवडणुकांना स्थगिती नाही, आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या संस्थांचा निकाल न्यायप्रविष्ट
पंतप्रधान शुक्रवारी महाराष्ट्र दौऱ्यावर, अटल सेतू, राष्ट्रीय युवा महोत्सव उद्घाटन

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा जनतेकडून शिक्कामोर्तब – दरेकर
Next Article कारागिरांनो… प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचा घ्या लाभ
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?