नवी दिल्ली, 3 डिसेंबर (हिं.स.) : मादागास्करच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा निवडून आल्याबद्दल अँड्री राजोएलिना यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.
पंतप्रधानांनी X वरील संदेशात म्हटले, “मादागास्करच्या राष्ट्राध्यक्षपदावर पुन्हा निवडून आल्याबद्दल @SE_Rajoelina तुमचे मनःपूर्वक अभिनंदन. व्हिजन सागर तसेच भारत – मादागास्कर यांच्यातील भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी तुमच्याबरोबर काम करण्यासाठी उत्सुक आहे.”
हिंदुस्थान समाचार
