नवी दिल्ली, 02 डिसेंबर (हिं.स.) : भारत आणि बांगलादेशात आज, शनिवारी सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. दोन्ही देशामध्ये सकाळी 9 वाजून 5 मिनीटांनी हे धक्के जाणावलेत. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 5.6 नोंदवण्यात आली. आतापर्यंत दोन्ही देशांमध्ये या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानीचे वृत्त नाही.
भूकंपाचे केंद्र जमिनीच्या पृष्ठभागाच्या खाली 55 किलोमीटर खोल होते. पश्चिम बंगालच्या कोलकाता शहरातही हे धक्के जाणवले. याव्यतिरिक्त, राज्यातील उत्तर चोवीस परगणा, हावडा आणि हुगळीसह उत्तर बंगालमधील विविध जिल्ह्यांमध्ये शनिवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. यासोबतच शेजारच्या बांगलादेशात ढाका, चितगाव, राजशाही, सिल्हेट, चुआडंगा, सिल्हेट आणि नोवाखाली येथे भूकंपाचे हादरे जाणवल्याची माहिती आहे.
हिंदुस्थान समाचार
