नवी दिल्ली, 8 डिसेंबर (हिं.स.) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील तसेच जगभरातील ज्यु जनतेला हान्नुकाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी या संदेशामध्ये इस्राएलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना देखील जोडून घेतले आहे.
एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात; “हान्नुका समेयाक! हान्नुकाच्या पर्वावर मी भारतातील तसेच जगभरातील आपल्या ज्यु मित्रांना सस्नेह शुभेच्छा देतो. हा सण प्रत्येकासाठी शांती, आशा आणि तेजस्विता घेऊन येवो. @netanyahu”
हिंदुस्थान समाचार
