अयोध्या, 30 डिसेंबर (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज, शनिवारी साकाळी अयोध्येत आगमन झाले. भारतीय हवाई दलाच्या विमानाने अयोध्येत पोहचलेल्या पंतप्रधानांचे राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महर्षि वाल्मिकी विमानतळावर स्वागत केले.
विमानतळाहून पंतप्रधान अयोध्याधाम जंक्शन येथे आयोजित कार्यक्रमासाठी रस्त्याने जातील. विमानतळ ते अयोध्याधाम जंक्शन दरम्यान रोड शो होणार आहे.रामनगरी अयोध्येच्या इतिहासात आज अनेक नवे अध्याय जोडले जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी चौथ्यांदा मर्यादा पुरुषोत्तमच्या भूमीवर आले आहेत. मिथिला ते रामनगरी रेल्वेने जोडण्याची संतांची बहुप्रतिक्षित इच्छा हा मार्ग पूर्ण करेल आणि विमान उड्डाणाचे स्वप्नही साकार होईल. रेल्वे स्थानकाच्या नवीन इमारतीचे उद्घाटनही करणार आहेत.
हिंदुस्थान समाचार
