पुणे , 9 डिसेंबर (हिं.स.) राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) मोठी कारवाई केली आहे. आज (शनिवार) एनआयएने महाराष्ट्रासह देशातील विविध शहरांमध्ये पहाटेपासून कारवाई करत १३ संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. राज्यात ठाण्याजवळील पडगा, पुणे आणि इतर ठिकाणी एनआयए आणि एटीएसची छापेमारी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, इसिसच्या दहशतवादी कट प्रकरणात कर्नाटक आणि महाराष्ट्रात आज सकाळपासून एनआयएकडून एकूण ४४ ठिकाणी छापे टाकण्यात आले. यामध्ये कर्नाटकातील १, पुण्यात २, ठाणे ग्रामीण ३१, ठाणे शहरात ९ आणि भाईंदर १ ठिकाण छापेमारी केली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली. यादरम्यान महाराष्ट्रातील भिवंडीच्या पडघा गावात ७ ते ८ लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे.या छापेमारीत पकडलेले दहशतवादी हे देशभरात अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याच्या तयारीत असल्याची खळबळजनक माहितीही समोर आली आहे. त्यांच्याकडून बॉम्बस्फोटाचे साहित्यही जप्त केले आहे. यापूर्वी पुण्यात सापडलेल्या दहशतवादी प्रकरणानंतर पडघा गावातून दोन ते तीन जणांना करण्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
हिंदुस्थान समाचार
