नाशिक : काँग्रेस नेते राहुल गांधी मंगळवार, १२ मार्च रोजी नाशिक दौऱ्यावरती येणार असून ते नाशिक मध्ये रोड शो देखील करणार आहे.
नाशिक हे राजकारणाचा एक महत्त्वपूर्ण बिंदू बनत असून जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक दौऱ्यावरती आले होते. त्यांनी रोड शो केल्यानंतर काळाराम मंदिरात दर्शन घेतले होते, तर मागील महिन्यात म्हणजे फेब्रुवारी ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांनी नाशिकचा दौरा करून पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन नाशिकमध्ये घेतले होते आणि यावेळी त्यांनी काळाराम मंदिराला भेट देऊन काळाराम मंदिराची आरती देखील केली होती.
आता काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी हे मंगळवारी 12 मार्च रोजी नाशिक दौऱ्यावरती येणार आहे त्यांची यात्रा नाशिकमार्गे मुंबईकडे जाणार आहे. त्यापूर्वी 11 मार्च रोजी मालेगाव मार्गे चांदवड मध्ये राहुल गांधी येथील आणि या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची ते संवाद साधला जाणार आहे. त्यानंतर राहुल गांधी हे नाशिक मध्ये येतील या ठिकाणी त्यांचा रोड शो होईल त्यानंतर ते काळाराम मंदिरात जातील या ठिकाणी काळा रामाचे दर्शन घेऊन आरती करतील नंतर त्यांची यात्रा ही मुंबईकडे रवाना होणार आहे.
