महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बुलढाण्याचे माजी आमदार असलेले सपकाळ हे तळागाळातील नेतृत्व म्हणून ओळखले जातात. गांधीवादी आणि सर्वोदयी विचारसरणीवर आधारित त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात दीर्घ अनुभव असलेल्या सपकाळ यांच्यासमोर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका आणि काँग्रेसच्या संघटनात्मक बळकटीकरणाची मोठी जबाबदारी असेल.
BulletsIn
-
जन्म आणि शिक्षण – सपकाळ यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९६८ रोजी झाला. त्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून बी.कॉम आणि बी. पी.एड पदवी प्राप्त केली आहे.
-
राजकीय प्रवास – जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजकारणात प्रवेश; १९९९-२००२ दरम्यान महाराष्ट्रातील सर्वात तरुण जिल्हा परिषद अध्यक्ष होते.
-
काँग्रेसमधील भूमिका – २०१४ ते २०१९ दरम्यान काँग्रेसचे आमदार राहिले. सध्या राजीव गांधी पंचायत राज संगठनचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यरत.
-
गांधीवादी विचारसरणी – महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या ग्रामस्वराज्य संकल्पनेच्या प्रचार आणि प्रसारात महत्त्वाची भूमिका बजावली.
-
सामाजिक कार्य – जलसंधारण व व्यवस्थापन प्रकल्प ‘जलवर्धन’ यशस्वीरित्या राबविला. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात विशेष योगदान.
-
आदिवासी सक्षमीकरण – बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी गावांच्या विकासासाठी गेल्या २५ वर्षांपासून कार्यरत.
-
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नेतृत्व – १९९६ मध्ये जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशनच्या आंतरराष्ट्रीय युवा परिषदेत भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केले.
-
काँग्रेसच्या संघटनात्मक जबाबदाऱ्या – पंजाब, गुजरात आणि मध्यप्रदेशचे काँग्रेस सहप्रभारी राहिले. विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकांसाठी स्क्रिनिंग कमिटी सदस्य म्हणूनही काम केले.
-
गांधी विचार दर्शन शिबिर समन्वयक – सेवाग्राम (वर्धा) येथे आयोजित राष्ट्रीय शिबिराच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका पार पाडली.
-
नव्या जबाबदाऱ्या आणि आव्हाने – प्रदेशाध्यक्ष म्हणून काँग्रेसला पुन्हा मजबूत करण्याचे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जिंकण्याचे मोठे आव्हान.
