नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर : आशियाई क्रीडा स्पर्धेत, पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओजस प्रवीण देवतळेचे कौतुक केले आहे. यासोबतच कंपाउंड तिरंदाजीमध्ये एकल प्रकारात रौप्य पदक पटकावल्याबद्दल तिरंदाज अभिषेक वर्मा याचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले आहे.
नरेंद्र मोदी यांनी X या समाजमाध्यमावर पोस्ट केले आहे. त्यात म्हटले आहे की, आशियाई क्रीडा स्पर्धेत कंपाऊंड तिरंदाजी पुरुषांच्या वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवल्याबद्दल ओजस प्रवीण देवतळेचे अभिनंदन. त्याने अचूकता, दृढनिश्चय आणि आपल्या लक्ष्याप्रती अढळ राहत, हे यश पुन्हा एकदा मिळवत देशाचा अभिमान उंचावला आहे.
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या एक्सवरील संदेशात म्हटले आहे, @archer_abhishek. ची लक्षणीय कामगिरी. कंपाउंड तिरंदाजीत पुरुष एकल प्रकारात रौप्य पदक पटकावल्याबद्दल अभिनंदन. त्याचे कौशल्य आणि खेळातील नैपुण्य याची चमक दिसून आली. या यशामुळे भारतात उत्साह संचारला आहे.
