महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यात नागपूर, कामठी, नांदेड आणि मुंबई येथील विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेणार असून भाजपच्या निवडणूक तयारीला बळकटी देणारी जाहीर सभा देखील होणार आहे.
BulletsIn
-
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी (आज) रात्री 9.30 वाजता नागपूर येथे आगमन करतील.
-
26 मे रोजी सकाळी 11 वाजता ते जामठा येथील राष्ट्रीय कर्करोग संस्थेत स्वस्ती निवास पंथगरच्या भूमिपूजन समारंभात सहभागी होतील.
-
त्यानंतर, दुपारी 1 वाजता चिंचोली (कामठी तहसील) येथे एनएफएसयूच्या स्थायी परिषदेचे भूमिपूजन करतील.
-
याच कार्यक्रमात एनएफएसयूच्या तात्पुरत्या कॅम्पसचे ई-उद्घाटन सुद्धा करण्यात येईल.
-
कामठीमधील कार्यक्रमानंतर ते नांदेडला रवाना होतील.
-
नांदेडमध्ये विविध स्थानिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेणार आहेत.
-
नांदेड येथे होणाऱ्या भाजपच्या जाहीर सभेत अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.
-
या सभेच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपचे प्रचार रणशिंग फुंकले जाईल.
-
27 मे रोजी अमित शहा मुंबईतील श्री नारायण मंदिर माधवबाग आणि सर कावसजी जहांगीर हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमांना हजेरी लावतील.
-
भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पूर्ण तयारी केली असून या दौऱ्यातून पक्षाची ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
