नवी दिल्ली, 22 डिसेंबर (हिं.स.) : सर्वोच्च न्यायालयाने वर्षभरात 52 हजार 191 प्रकरणे निकाली काढली आहेत. गेल्या वर्षी कोर्टाने 39 हजार 800 खटले निकाली काढले होते. या वर्षी न्यायालयाने गेल्या वर्षीच्या तुलनेत 12 हजार (31.13 टक्के) जास्त प्रकरणे निकाली काढली आहेत. सुप्रीम कोर्टाने आज, शुक्रवारी प्रसिद्धीपत्रक जारी करून ही माहिती दिली आहे.
यावर्षी सर्वोच्च न्यायालयात 1 जानेवारी ते 15 डिसेंबर या कालावधीत 49,191 प्रकरणे सुनावणीसाठी आली. तसेच यावर्षी 3 हजार अनुशेष प्रकरणे निकाली काढली आहेत. त्याचे श्रेय न्यायालयाने नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब आणि न्यायव्यवस्थेतील सुधारणांना दिले आहे.सर्वोच्च न्यायालयाने प्रसिद्धीपत्रकात सांगितले की, सरन्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी न्यायव्यवस्था सुव्यवस्थित केली आहे. यापूर्वी गुन्हा दाखल झाल्यानंतर सुनावणीसाठी 10 दिवस लागत होते. आता 5 ते 7 दिवसांत सुनावणी होते. जामीन आणि अटकपूर्व जामीन प्रकरणे एका दिवसात किंवा तातडीने सुनावणीसाठी ठेवली जातात. त्यामुळे खटले निकाली काढण्याचा वेग वाढला आहे.
हिंदुस्थान समाचार
