मुंबई, 12 डिसेंबर (हिं.स.) : मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस ते मऊ जंक्शन दरम्यान नवीन रेल्वे सेवा सुरू करीत आहे.
तपशील खालीलप्रमाणे:-
ट्रेन क्रमांक १५१८२ लोकमान्य टिळक टर्मिनस – मऊ जंक्शन साप्ताहिक एक्सप्रेस दि. १८.१२.२०२३ पासून दर सोमवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ११.१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १८.३० वाजता मऊ जंक्शन येथे पोहोचेल.
ट्रेन क्रमांक १५१८१ मऊ जंक्शन – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक एक्सप्रेस दि. १६.१२.२०२३ पासून दर शनिवारी २२.१५ वाजता मऊ जंक्शन येथून सुटेल आणि तिसर्या दिवशी ०३.४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
थांबे: लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, हरदा, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज, प्रयाग, फूलपुर, जंघाई, मरिअहू, जौनपूर, शहागंज, खोरासन रोड, आझमगड, मुहम्मदाबाद आणि मऊ जंक्शन.
संरचना: २१ डब्बे ज्यामध्ये:- २ द्वितीय वातानुकूलित, ६ तृतीय वातानुकूलित (इकॉनॉमी क्लास), ७ शयनयान, ५ सामान्य द्वितीय श्रेणी व गार्डस् ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कम लगेज ब्रेक व्हॅन.
आरक्षण: ट्रेन क्रमांक १५१८२ साठी बुकिंग दि. १४.१२.२०२३ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध असेल.
तपशीलवार वेळ आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in संकेतस्थळाला भेट द्या किंवा एनटीईएस (NTES) अॅप डाउनलोड करा.
हिंदुस्थान समाचार
