भोपाळ , 1 डिसेंबर (हिं.स.)। मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यात एक मोठा अपघात झाला आहे. बरेली–पिपरिया रोडवरील नयागाव पुल अचानक कोसळला. या दुर्घटनेत दहा जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुल कोसळताना वाहतूक सुरू होती आणि पुलावरून वाहनं जात होती. पुल तुटल्यामुळे संपूर्ण रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार
दुर्घटनेच्या वेळी चार मोटरसायकलीही पुलावरून जात होत्या, ज्या पुल कोसळताच खाली दबल्या. मोटरसायकलींवर स्वार असलेले चार युवक नदीत खाली पडले. चौघांनाही उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचून मदत व बचाव कार्यात गुंतले आहेत.
पोलीसांच्या माहितीनुसार पुलावर एकूण आठ जण दुरुस्तीचे काम करत होते. पुल कोसळल्याने सहा मजूर मलब्याखाली दबले. स्थानिकांच्या मदतीने सर्व सहा मजूरांना मलब्यातून बाहेर काढण्यात आले आणि तात्काळ बरेलीच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पुल खाली कोसळताना पाहून काम करणारे मजूर पळून गेले आणि त्यांनी जीव वाचवला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. प्रशासनाने नुकसानग्रस्त पुलाच्या आसपासचे आवागमन बंद केले असून मलबा हटवणे आणि दबलेल्यांचा शोध घेण्याचे काम प्राधान्याने सुरू केले आहे. अपघातातील जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पुल कोसळण्याच्या कारणांची चौकशी सुरू असून हा पूल सुमारे 35 वर्षे जुना असल्याचे सांगितले जात आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode
