इम्फाल, 27 नोव्हेंबर (हिं.स.) : मणिपूरमधल्या कुकी गटाने 12 दिवस बंद असलेले 2 राष्ट्रीय महामार्ग आज, सोमवारी खुले केले. कांगपोकपीच्या आदिवासी एकता समितीने (सीओटीयू) 15 नोव्हेंबर रोजी हे महामार्ग बंद केले होते. कुकी-डोबहुल भागात कायदा व सुव्यवस्था पूर्ववत करण्यात प्रशासन कुचराई करत असल्याचा त्यांचा आरोप आहे.
प्रशासनाच्या या वृत्तीचा निषेध व्यक्त करत या समाजाने इम्फाल शहराला नागालँड शहर दिमापूर आणि आसाम शहर सिलचर यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचा काही भाग रोखून धरला होता, जेणेकरून इम्फाळ आणि मणिपूरच्या इतर शहरांना मालाचा पुरवठा होऊ नये. परंतु, नंतर या भागातील आदिवासींच्या समस्या समजून घेत समितीने हा आर्थिक अडथळा तात्पुरता दूर केला. मात्र, गरज भासल्यास बंद उठवण्याच्या निर्णयाचा आढावा घेऊन त्याची पुन्हा अंमलबजावणी करू, असे समितीने म्हटले आहे.
हिंदुस्थान समाचार
