नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर (हिं.स.) : भारताने शेजारी देशांशी असलेल्या सीमेवरील 8 संवेदनशील ठिकाणी रेडिएशन डिटेक्शन इक्विपमेंट (आरडीई) बसवण्याचा निर्णय घेतलाय. पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि म्यानमारमधून किरणोत्सर्गी सामग्रीची तस्करी होण्याचा धोका आहे. हे लक्षात घेऊन सरकारने सीमेवरील 8 संवेदनशील ठिकाणी आरडीई बसवण्याचे निश्चित केलेय. या आरडीई उपकरणाद्वारे किरणोत्सारी पदार्थ ओळखण्यास मदत होणार आहे.
सीमा भारात किरणोत्सारी पदार्थांची तपासणी करणे आवश्यक आहे, कारण त्यांचा वापर अण्वस्त्रे बनवण्यासाठीही केला जाऊ शकतो. त्यामुळे भारताने अटारी (पाकिस्तान सीमा), पेट्रापोल, आगरतळा, डवकी आणि सुतारकांडी (सर्व बांगलादेश सीमेवर), रक्सौल आणि जोगबानी (नेपाळ) आणि मोरेह (म्यानमार) च्या चेक पोस्ट्स (आयसीपीएस) येथे आरडीई स्थापित केले जातील.ज्या 8 भागात हे रेडिएशन डिटेक्शन उपकरण बसवण्यात येणार आहे, त्या ठिकाणी सीमेपलीकडून मोठ्या प्रमाणात लोकांची व वस्तूंची ये-जा असते.या प्रकल्पाशी संबंधित एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सरकारने गेल्या वर्षीच आरडीई इन्स्टॉलेशनला मंजुरी दिली होती. ज्या कंपनीला ऑर्डर देण्यात आली होती ती कंपनी लवकरच ते बसवण्याचे काम सुरू करेल. किरणोत्सर्गी सामग्रीची तस्करी भारताच्या सुरक्षेसाठी आव्हान असू शकते कारण त्याचा वापर आण्विक उपकरणे किंवा किरणोत्सर्गी किरणोत्सर्ग पसरविणारी उपकरणे तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो अशी माहिती संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
हिंदुस्थान समाचार
