cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > National > पुणे कथित जमीन घोटाळा प्रकरणात आमचा एका रुपयाचाही व्यवहार झाला नाही – अजित पवार
National

पुणे कथित जमीन घोटाळा प्रकरणात आमचा एका रुपयाचाही व्यवहार झाला नाही – अजित पवार

CliQ INDIA
Last updated: November 10, 2025 6:35 am
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE

पुणे, 9 नोव्हेंबर (हिं.स.)। निवडणुका सुरू झाल्या की आमच्यावर आरोप होतात. आधीही ७० कोटींचे गैरव्यवहार झाल्याचे आरोप होते, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरेगाव पार्कमधील जमीन घोटाळ्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी पुण्यातील जमीन खरेदीत कथित गैरव्यवहार केल्याचा विरोधकांकडून आरोप होत आहे. अशा स्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत माध्यमांशी बोलताना आपली बाजू मांडली.

विरोधकांनी केलेले आरोप त्यांनी फेटाळून लावले आहेत. एक रुपयाचा व्यवहार न करता नुसते आकडे देऊन कसा कागद देऊन कसा व्यवहार होऊ शकतो, हे आजपर्यंत मला कळले नाही. नोंदणी कार्यालयातील व्यक्तीने अशी नोंदणी का केली? चुकीचे काम का केले? हे चौकशीअंती आपल्याला कळेल? निवडणुका जवळ आल्या की, आमच्यावर आरोप सुरू होतात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, माझे नातेवाईक असले तरी दबावात चौकशी करू नये. कुणीही चुकीचे केले असल्यास कारवाई करावी. माझ्या राजकीय जीवनात कुठलीही चूक केली नाही. कोरेगाव पार्क कथित जमीन घोटाळा प्रकरणात आमचा एका रुपयाचाही व्यवहार झाला नाही. मुंढवा जमिनीची किंमत २००३ मध्ये दीड लाख रुपये होती. जनतेसमोर या प्रकरणाची लवकरच माहिती येईल. एफआयआर दाखल झाला आहे. मी कालही चुकीचं केलं नाही. पुढेही चुकीचं करणार नाही, असे ठामपणानं त्यांनी सांगितलं.पार्थ पवार यांनी कथित जमीन घोटाळ्याबाबत खुलासा केला नाही. त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पार्थनं नाही, पण मी म्हणजे त्याच्या बापानं भूमिका मांडली आहे. चुकीच्या आरोपामुळे बदनामी होते.

मधल्या काळात काही घटना घडल्या. त्याबद्दल मी माझी भूमिका स्पष्ट मांडली आहे. त्या संदर्भात एफआयआर दाखल झाला असून, चौकशी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी एका महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. एक रुपयाचा व्यवहार न होता नुसते आकडे लिहून कसा काय कागद तयार होऊ शकतो? हे मला आजवर समजलेलं नाही. त्यामुळे मीही या प्रकाराने आश्चर्यचकित आहे.” असं म्हणत अजित पवार यांनी निबंधकांना आरोपीच्या पिंजाऱ्यात उभं केलं आहे.

अधिकाऱ्यांना आवाहन करताना पवार म्हणाले, “मी नेहमी सांगतो, कोणत्याही दबावाला बळी पडू नका. माझे नातेवाईक, कार्यकर्ते, अधिकारी कोणीही असतील, नियमात न बसणारे काम करू नका. क्लास वन, क्लास टू, आयएएस, आयपीएस सर्वांनी कायद्याप्रमाणे वागावं.” अजित पवार यांनी पुणे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बारामती आणि माळेगाव नगरपंचायतीच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत भाष्य केले. चढ-उतार आले तरी बारामतीकर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, असे सांगत त्यांनी जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. बारामती आणि माळेगावचा पुढील पाच वर्षांत कायापालट करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. पवार यांनी स्थानिक निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढण्याची आपली 1991 पासूनची भूमिका स्पष्ट केली, ज्यामुळे पक्षविरोधी कारवाई करणे सोपे होते. आगामी गुरुवारी बारामती येथे ते राष्ट्रवादी भवनमध्ये नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत. सोमवार ते बुधवारपर्यंत फॉर्म भरण्याऐवजी गुरुवारी फॉर्म भरण्याचे आवाहन त्यांनी आपल्या समर्थकांना केले, तर इतरांना त्यांच्या इच्छेनुसार अर्ज भरण्याचे स्वातंत्र्य असल्याचे सांगितले. —————

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु

You Might Also Like

तेलंगणात केंद्रीय आदिवासी विद्यापीठ स्थापनेसाठी सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर
देशातील सात शक्तिपीठांवर ‘शक्ती-संगीत आणि नृत्य महोत्सव’
जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-एनसी आघाडीवर | BulletsIn
जबलपूरमध्ये होणार संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक
उच्च न्यायालयाने व्यावसायिक कार्यांसाठी दुरुपयोग करण्यात आलेल्या निवासी भागांवर जयपूर नागरी सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत.

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article असीम मुनीर यांना अधिकार देणाऱ्या घटना दुरुस्तीवरून विरोधी पक्ष रस्त्यावर
Next Article सार्वजनिक वाहतूक : सामाजिक महत्त्व, मानवकेंद्री विकासाचा अनिवार्य मार्ग
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?