cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > National > दादर–रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करा; अन्यथा युपी-बिहारला जाणाऱ्या गाड्या रोखू – मनसेचा इशारा
National

दादर–रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करा; अन्यथा युपी-बिहारला जाणाऱ्या गाड्या रोखू – मनसेचा इशारा

CliQ INDIA
Last updated: March 25, 2026 6:35 am
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE
MNS Resume Dadar Ratnagiri Passenger Train

मुंबई, 24 मार्च (हिं.स.)। मुंबईतील कोकणवासीयांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली दादर–रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन पुन्हा पूर्ववत सुरू करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. कोरोनाच्या काळात बंद करण्यात आलेली ही ट्रेन पुन्हा सुरू झाली असली तरी सध्या ती फक्त दिवा स्थानकापर्यंतच धावते. त्यामुळे मुंबईत राहणाऱ्या कोकणातील प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

पूर्वी ही पॅसेंजर ट्रेन दादर ते रत्नागिरी अशी थेट धावत होती. मात्र रेल्वे प्रशासनाने कोणतेही ठोस कारण न देता तिचा मार्ग कमी करून ती दिवा स्थानकापर्यंतच मर्यादित ठेवली. यामुळे प्रवाशांना दादर किंवा मुंबईतील इतर भागातून दिवा येथे जाऊन ही ट्रेन पकडावी लागते, ज्यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाढतो. या पार्श्वभूमीवर मनसेने हा प्रश्न हाती घेतला असून, लवकरात लवकर ट्रेन दादरपर्यंत सुरू करावी, अशी मागणी केली आहे.

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना स्पष्ट इशारा दिला की, येत्या १५ ते २० दिवसांत ही मागणी मान्य झाली नाही तर उत्तर प्रदेश आणि बिहारकडे जाणाऱ्या एक्सप्रेस गाड्या रोखण्याचा आंदोलनात्मक मार्ग अवलंबला जाईल. त्यांनी सांगितले की, कोकणात जाणाऱ्या सामान्य चाकरमान्यांसाठी ही ट्रेन जीवनरेखा आहे आणि त्यांची गैरसोय सहन केली जाणार नाही.

याच मुद्द्यावर मनसेचे आणखी एक नेते नितीन सरदेसाई यांनीही रेल्वे प्रशासनावर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले की, कोकण रेल्वेसाठी स्थानिकांनी आपली जमीन दिली, पण आज त्याच कोकणवासीयांना योग्य सुविधा मिळत नाहीत. रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे की, दादरपर्यंत पॅसेंजर ट्रेन चालवल्यास लोकलच्या वेळापत्रकात अडथळे निर्माण होतात, मात्र हा मुद्दा मान्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सरदेसाई यांनी पुढे सांगितले की, कोकणवासीयांचा सहनशीलपणा गृहित धरू नये. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न प्रलंबित आहे, रस्त्यांची परिस्थिती खराब आहे आणि आता रेल्वे सेवेतही मर्यादा आणल्या जात आहेत. सरकार रो-रो सेवा सुरू करण्याच्या घोषणा करते, पण पॅसेंजर ट्रेनसारख्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष का केले जाते, महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी काय करत आहेत, हे मुद्दे संसदेत का मांडत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.मनसेने स्पष्ट केले आहे की, कोकणवासीयांच्या हक्कासाठी ते लढा देणार असून, दादर–रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन पूर्ववत सुरू करण्यासाठी आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल.

—————

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule

You Might Also Like

बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पंतप्रधानांकडून आदरांजली
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६: भाजपची उमेदवार यादी वाढली, प्रचाराची रणधुमाळी तीव्र!
सोने आणि चांदीच्या किमतीत भारतात बाजारपेठेच्या चढउतार आणि जागतिक संकेतांमुळे तीव्र सुधारणा
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांचा जेडीयूमध्ये प्रवेश
पंतप्रधान मोदी जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर इंधन वाचवण्याच्या मोहिमेला चालना देत आहेत, त्रंप इराणमध्ये युद्धविराम कोसळण्याची भीती व्यक्त करत आहे

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article इराण आणि लेबनॉनवरील हल्ले सुरूच राहतील-नेतन्याहू
Next Article राजस्थान रॉयल्सला मिळाला नवीन मालक
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?