मुंबई, 2 नोव्हेंबर (हिं.स.) : रेल्वेने खाली दिलेल्या तपशिलांनुसार लोकमान्य टिळक टर्मिनस – एर्नाकुलम दुरांतो एक्सप्रेसची संरचना बदलण्याचा निर्णय घेतला आहे:
12223 लोकमान्य टिळक टर्मिनस – एर्नाकुलम दुरांतो एक्सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. ०२.०३.२०२४ पासून प्रभावी असेल.
12224 एर्नाकुलम- लोकमान्य टिळक टर्मिनस दुरांतो एक्सप्रेस एर्नाकुलम येथून दि.०३.०३.२०२४ पासून प्रभावी असेल.
विद्यमान संरचना: १ प्रथम वातानुकूलित, २ द्वितीय वातानुकूलित, ६ तृतीय वातानुकूलित, ४ शयनयान, १ वातानुकूलित पॅंट्री कार, एक लगेज कम गार्डची ब्रेक व्हॅन आणि एक गेरेटर कार = १६ एलएचबी कोच.
सुधारित संरचना: १ प्रथम वातानुकूलित, २ द्वितीय वातानुकूलित, ६ तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान, १ सामान्य द्वितीय श्रेणी, १ गार्ड ब्रेक व्हॅन, १ वातानुकूलित पॅंट्री कार आणि १ जनरेटर व्हॅन.
प्रवाशांना विनंती केली जाते की त्यांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी त्यांच्या प्रतीक्षा यादीतील तिकिटांची स्थिती तपासावी.
या गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.
हिंदुस्थान समाचार
