नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर (हिं.स.) : गुरु नानक देव जी यांच्या जयंती निमित्त मी सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा देतो.
गुरु नानक देव जी यांनी अध्यात्मिक ज्ञानाचा प्रकाश दाखवला. त्यांची शिकवण मानवतेचा मार्ग दाखवते, सर्व प्राणिमात्रांमधील एकतेवर भर देते आणि समानता, दयाभाव आणि निःस्वार्थी सेवेचा पुरस्कार करते. त्यांचा सहिष्णुता आणि अपार करुणेचा संदेश जात, पंथ, धर्म आणि देशाच्या सीमा ओलांडून मानवजातीला मार्गदर्शन करत आहे.
आजच्या शुभ दिवशी प्रामाणिकपणा, समरसता आणि वैश्विक बंधुत्वाच्या तत्त्वांचे प्रदर्शन आणि आचरण करूया.
हिंदुस्थान समाचार
