cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > National > इराण-इस्रायल संघर्षाची झळ भारतापर्यंत; मुंबईच्या कांदिवलीतील तरुणाचा ड्रोन हल्ल्यात मृत्यू
National

इराण-इस्रायल संघर्षाची झळ भारतापर्यंत; मुंबईच्या कांदिवलीतील तरुणाचा ड्रोन हल्ल्यात मृत्यू

CliQ INDIA
Last updated: March 5, 2026 6:35 am
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 04 मार्च (हिं.स.)। इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीची झळ आता थेट भारतापर्यंत पोहोचली आहे. ओमानच्या मस्कत किनारपट्टीजवळ गल्फ ऑफ ओमानमध्ये एका मालवाहू तेलवाहू जहाजावर झालेल्या ड्रोन हल्ल्यात मुंबईतील कांदिवली येथील दीक्षित सोलंकी (वय २५) याचा मृत्यू झाला आहे. हा हल्ला इराण-इस्रायल संघर्षाशी संबंधित असल्याचे प्राथमिक संकेत मिळत असून आंतरराष्ट्रीय सागरी मार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मूळचा गुजरातमधील दीव येथील असलेला दीक्षित काही वर्षांपूर्वी रोजगाराच्या निमित्ताने मुंबईत आला होता. तो मार्शल आयलंड्स ध्वज असलेल्या ‘एमकेडी व्योम’ या तेलवाहू जहाजावर खलाशी म्हणून कार्यरत होता. मस्कत किनारपट्टीपासून सुमारे बावन्न सागरी मैल अंतरावर असताना स्फोटकांनी भरलेल्या मानवरहित बोटीने जहाजावर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात जहाजाच्या इंजिन कक्षात भीषण स्फोट होऊन आग लागली आणि त्यात दीक्षितचा जागीच मृत्यू झाला.

दीक्षित हा दीव येथील मच्छीमार व्यावसायिक अमृतलाल सोलंकी यांचा धाकटा मुलगा होता. महिनाभरापूर्वीच त्याच्या आईचे निधन झाले होते. आईच्या अंत्यसंस्कारानंतर तो पुन्हा कर्तव्यावर परतला होता. मात्र या दुर्दैवी घटनेमुळे सोलंकी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या घटनेपूर्वी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत ‘एमव्ही स्कायलाइट’ या जहाजावरही हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात बिहारमधील आशिष कुमार आणि राजस्थानमधील दलीप सिंग हे दोन भारतीय खलाशी गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासून बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरू असून त्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या सलग घटनांमुळे आखाती सागरी मार्गावरील तणाव अधिकच वाढला आहे.

भारतीय दूतावासाकडून दुःख व्यक्त

ओमानमधील भारतीय दूतावासाने दीक्षित सोलंकीच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. टँकरवरील इतर २५ क्रू मेंबर्सची (ज्यात १६ भारतीय होते) सुखरूप सुटका करण्यात आली आहे. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय सागरी मार्गावरील भारतीय खलाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

—————

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule

You Might Also Like

घराणेशाहीमुळे उत्तरप्रदेशचा विकास थांबला- पंतप्रधान
एमपीएससी परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर, महेश घाटुळे प्रथम | BulletsIn
ट्रम्प प्रत्येक अडचण शुल्क वाढवून सोडवू इच्छितात – शशी थरूर
ईद-उल-फित्र २०२६: देशभरात नमाजच्या वेळा, रमजानचा शेवट उत्सवांनी साजरा
सामन्यादरम्यान ‘फ्री पॅलेस्टाईन’चा संदेश देण्यासाठी पॅलिस्टिनी समर्थक खेळपट्टीवर

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article इस्रायलच्या धमकीनंतर इराणी सरकारने मोजतबा खामेनेई यांना उत्तराधिकारी बनवल्याच्या बातम्यांना फेटाळले
Next Article इंग्लंड विरुद्धच्या उपांत्य सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेटपटू सिद्धिविनायकाच्या दर्शनाला
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?