cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > National > आय-पीएसी छापा प्रकरण : सुप्रीम कोर्टाची ममता बॅनर्जी सरकारला नोटीस
National

आय-पीएसी छापा प्रकरण : सुप्रीम कोर्टाची ममता बॅनर्जी सरकारला नोटीस

CliQ INDIA
Last updated: January 16, 2026 6:35 am
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE

तपास यंत्रणेविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरला स्थगिती

नवी दिल्ली, 15 जानेवारी (हिं.स.)आय-पीएसी छापा प्रकरणात ममता बॅनर्जी सरकारलाही सुप्रीम कोर्टाकडून झटका बसला आहे. ईडी अधिकाऱ्यांविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरवर पुढील सुनावणीपर्यंत स्थगित राहील असे सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की तपास कोणत्याही दबावाशिवाय करावा. न्यायालयाने ८ जानेवारी रोजी शोधलेल्या परिसराचे सीसीटीव्ही फुटेज जतन करण्याचे निर्देश दिले आहेत.

सुप्रीम कोर्टाने हे मान्य केले की, पश्चिम बंगाल सरकार आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी आय-पीएसी छापा प्रकरणात ईडीच्या तपासात हस्तक्षेप केला. न्यायालयाने ममता बॅनर्जी सरकार आणि राज्य पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आणि त्यांना दोन आठवड्यांच्या आत त्यांचे उत्तर दाखल करण्याचे आदेश दिलेत.

सुनावणी दरम्यान, सुप्रीम कोर्टाने सांगितले की, ईडीला निवडणूक कामात किंवा पक्षाच्या कामात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. पण राज्य सरकारी संस्थांनाही केंद्रीय तपासात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही असे म्हटले आहे. न्यायालयाच्या मते, हे प्रकरण कायद्याचे राज्य आणि देशातील संवैधानिक संस्थांच्या स्वतंत्र कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित करते.

आपल्या आदेशात, खंडपीठाने ईडीचा युक्तिवाद देखील विचारात घेतला की, टीएमसीच्या कायदेशीर कक्षाने ९ जानेवारी रोजी उच्च न्यायालयात गर्दी जमवण्यासाठी व्हॉट्सऍप संदेश पाठवले. त्यामुळे न्यायालयाच्या आवारात गोंधळ उडाला. एसजी तुषार मेहता यांनी याला गंभीर मुद्दा असे संबोधले, की या कारवायात वरिष्ठ राज्य पोलीस अधिकारीही सहभागी होते, ज्याची सुप्रीम कोर्टाने चौकशी करावी.

न्यायालयाने सुरुवातीला मान्य केले की, केंद्रीय एजन्सीच्या छाप्यांमध्ये राज्य सरकारचा हस्तक्षेप अत्यंत गंभीर आहे आणि जर अशा घटना रोखल्या गेल्या नाहीत तर अराजकता वाढण्याचा धोका आहे. खंडपीठाने म्हटले की, गुन्हेगारांना केवळ राज्य एजन्सीचे सदस्य असल्याने संरक्षण देता येणार नाही.

सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला सर्व सीसीटीव्ही फुटेज आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जतन करण्याचे निर्देश दिलेत. जेणेकरून त्यानंतरच्या खटल्यात कोणताही पुरावा प्रभावित होणार नाही. न्यायालयाने पुनरुच्चार केला की, हे प्रकरण केवळ छापा किंवा संघर्ष नाही तर कायद्याच्या राज्यासाठी महत्त्वाचा एक संवैधानिक मुद्दा आहे.

खंडपीठाने असेही जोडले की, केंद्रीय एजन्सी निवडणूक कार्यात हस्तक्षेप करू शकत नसल्या तरी, संबंधित तथ्ये समोर आल्यास त्यांना तपास करण्यापासून रोखणे राज्य एजन्सींना देखील अस्वीकार्य आहे. सुप्रीम कोर्टाच्या मते, ‘ईडी तपास आणि संबंधित बाबींमध्ये राज्य एजन्सीचा अडथळा हा गंभीर चिंतेचा विषय आहे, ज्याची चौकशी करणे आवश्यक आहे.’

—————

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे

You Might Also Like

राजपाल यादव यांना अंतरिम जामीन मंजूर, तुरुंगवासाच्या मुदतीनंतर चित्रपट उद्योगाचा पाठिंबा मागत आहेत
निवडणूक रोखे प्रकरणी एसआयटी चौकशी व्हावी- काँग्रेस
माजी केंद्रीय मंत्री संघर्षशील नेता बबनराव ढाकणे यांचे निधन
पंतप्रधानांच्या जीवाला धोका, मुंबई पोलिसांना घातपात करण्याचा मेल
प्रजासत्ताक दिन संचलन पाहण्यासाठी 10,000 विशेष पाहुण्यांना निमंत्रण | BulletsIn

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article अमेरिकेची 75 देशांच्या नागरिकांसाठी व्हिसा प्रक्रिया स्थगित
Next Article ऑस्ट्रेलियन ओपन २०२६ ड्रॉ : सिनर आणि जोकोविचमध्ये उपांत्य फेरीच्या लढतीची शक्यता
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?