cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > National > अंतरिक्षातील वाढता कचरा व उपग्रहांची गर्दी चिंतेचा विषय
National

अंतरिक्षातील वाढता कचरा व उपग्रहांची गर्दी चिंतेचा विषय

CliQ INDIA
Last updated: April 18, 2026 6:35 am
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE
इस्त्रो लोगो

इस्त्रोला 2025 मध्ये मिळाले 1.5 लाखांहून अधिक अलर्ट

बंगळुरू, 17 एप्रिल (हिं.स.) : अंतराळात वाढत असलेला अवकाश कचरा आणि उपग्रहांची वाढती संख्या ही आता जागतिक अंतराळ संस्थांसाठी मोठी चिंता बनली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) इंडियन स्पेस सिच्युएशनल अवेअरनेस रिपोर्ट-2025 मध्ये या धोक्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या अहवालानुसार, 2025 मध्ये इस्त्रोला सुमारे 1.5 लाखांहून अधिक क्लोज एप्रोच अलर्ट्स प्राप्त झाले. या अलर्ट्समुळे संभाव्य टक्कर टाळण्यासाठी भारतीय उपग्रहांना 18 वेळा कोलिजन अवॉइडन्स मॅन्यूव्हर (सीएएम) करावे लागले.

वर्तमानात इस्त्रो पृथ्वीभोवती 53 कार्यरत उपग्रह चालवत आहे. यामध्ये 22 उपग्रह लो अर्थ ऑर्बिट मध्ये पृथ्वीपासून 500–1000 किमी उंचीवर) 31 उपग्रह जियोसिंक्रोनस अर्थ ऑर्बिटमध्ये (सुमारे 36,000 किमी उंचीवर) आहेत. लो अर्थ ऑर्बिटमधील उपग्रह पृथ्वी निरीक्षण आणि वैज्ञानिक प्रयोगांसाठी वापरले जातात, तर जियोसिंक्रोनस उपग्रह हवामान, दूरसंचार आणि नेव्हिगेशन सेवांसाठी महत्त्वाचे ठरतात. अहवालानुसार, लो अर्थ ऑर्बिटमध्ये उपग्रहांची संख्या वेगाने वाढत असून अवकाश कचऱ्याचा धोका गंभीर बनला आहे. गेल्या वर्षी 2025 मध्ये यूएस स्पेस कमांडच्या कॉम्बाइंड स्पेस ऑपरेशन्स सेंटर ने सुमारे 1.5 लाख क्लोज एप्रोच अलर्ट्स जारी केले.

अवकाशात कचरा आणि उपग्रह सुमारे 28 हजार किलोमीटर प्रतितास वेगाने फिरतात. त्यामुळे अगदी लहान कणाची टक्करही मोठे नुकसान करू शकते.

या अलर्ट्सच्या आधारे इस्त्रोने 14 मॅन्यूव्हर LEO उपग्रहांसाठी 4 मॅन्यूव्हर GEO उपग्रहांसाठी

एकूण 18 वेळा कक्षा बदल केले. यामध्ये 1.2 अब्ज डॉलर्स मूल्याचा निस्सार उपग्रह देखील समाविष्ट होता, ज्याला संभाव्य टक्कर टाळण्यासाठी सुरक्षित कक्षेत हलवण्यात आले.

कोलिजन अवॉइडन्स मॅन्यूव्हरमध्ये उपग्रहांचे थ्रस्टर्स वापरून कक्षा बदलली जाते. मात्र, यासाठी इंधन खर्च होते. उपग्रहातील इंधन मर्यादित असल्यामुळे अशा हालचालींमुळे त्यांचा कार्यकाळ कमी होऊ शकतो गेल्यावर्षी 2025 मध्ये इस्त्रोच्या सर्व 5 प्रक्षेपणांपूर्वी टक्कर धोका तपासावा लागला. एका प्रकरणात एलव्हीएम3-एम6 मिशनचे प्रक्षेपण 41 सेकंदांनी पुढे ढकलण्यात आले.

तसेच चांद्रयान-2 ऑर्बिटरसाठी 16 वेळा ऑर्बिट बदल करण्यात आले, तर एकूण 84 वेळा मिशन नियोजनात बदल करावा लागला.

अहवालानुसार, अंतराळात 10 सेमीपेक्षा मोठे सुमारे 40 हजार कचऱ्याचे तुकडे 1 सेमीपेक्षा मोठे सुमारे 12 लाख तुकडे असून सध्या हजारो नवीन उपग्रह प्रक्षेपित होत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनत आहे.अंतराळ आता केवळ संशोधनाचे क्षेत्र न राहता अत्यंत गर्दीचे आणि जोखमीचे वातावरण बनत आहे. भविष्यात उपग्रह व्यवस्थापन आणि अवकाश कचरा नियंत्रण हे जागतिक अंतराळ मोहिमांसाठी सर्वात मोठे आव्हान ठरणार आहे.

—————————-

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी

You Might Also Like

लोकसभेसाठी कमल हासनचा ‘डीएमके’ला पाठिंबा
जरांगेंच्या मागण्यांवर लवकरच अंतिम प्रस्ताव सादर केला जाईल – विखे पाटील
कोकण विभागात 54 कौशल्य विकास केंद्र कार्यान्वीत
प्रचंड मौल्यवान धातूच्या वाढीच्या पार्श्वभूमीवर सोन्याची किंमत झपाट्याने वाढते.
नॅक मूल्यांकन प्रक्रियेत सुधारणा करण्याबाबत पाटील यांची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना विनंती

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article इस्रायलसोबत १० दिवसांच्या युद्धविरामानंतर लेबनानमध्ये हजारो कुटुंबांचा परतीचा प्रवास सुरू
Next Article विराट कोहली इन्स्टाग्राम ‘लाईक’ मुळे पुन्हा चर्चेत
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?