cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > International > पाकव्याप्त काश्मिरात हजारो लोक रस्त्यावर, सैन्य तैनात
International

पाकव्याप्त काश्मिरात हजारो लोक रस्त्यावर, सैन्य तैनात

CliQ INDIA
Last updated: September 30, 2025 6:38 am
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE

इस्लामाबाद , 29 सप्टेंबर (हिं.स.)।पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर (पीओके) मध्ये पाक सरकारविरुद्ध लोकांचा रोष प्रचंड प्रमाणात उफाळून बाहेर आला आहे. पीओकेमध्ये महागाईने लोक त्रस्त झाले आहेत, त्यामुळे संतप्त जनता आता सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरली आहे. पीओकेमध्ये सध्या अवामी अ‍ॅक्शन कमिटी (एएसी) च्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर निदर्शनं सुरू असून परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पाकिस्तानी सरकारने सुरक्षा दल तैनात केले आहे.

एएसीच्या नेतृत्वाखाली पीओकेमध्ये सरकारविरोधी आंदोलन सुरु झालं आहे. परिस्थिती इतकी वाईट झाली आहे की, आज सोमवारी पीओकेमध्ये पूर्ण बंद ची घोषणा करण्यात आली, ज्यामुळे लॉकडाऊनसारखी स्थिती निर्माण झाली आहे.हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनामुळे सामान्य जनजीवन ठप्प झालं आहे. दुकानं,रस्ते, सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली आहे. मुजफ्फराबादपासून कोटलीपर्यंत, अवामी अ‍ॅक्शन कमिटीच्या आवाहनावरून मोठ्या संख्येने लोक सरकारविरोधी निदर्शनात सहभागी होत आहेत. आंदोलनकर्ते “ न्याय आणि अधिकार” यांचे नारे देत आहेत.

अवामी अ‍ॅक्शन कमिटी हे एक नागरी संघटना आहे, जे अलिकडच्या काही महिन्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय झालं आहे. यामध्ये मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले आहेत.या संघटनेने 38 सूत्री मागण्यांचा चार्टर जाहीर केला आहे. त्यामध्ये, पीओके विधानसभा मध्ये असलेल्या काश्मीरी निर्वासितांसाठी राखीव 12 जागा रद्द कराव्यात, अन्नधान्यांवर सबसिडी मिळावी, मंगला जलविद्युत प्रकल्पामधून योग्य दरात वीज मिळावी आणि इस्लामाबादने दिलेली जुनी आश्वासने प्रत्यक्षात उतरवावीत अश्या काही प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.

मुजफ्फराबादमध्ये लोकांना संबोधित करताना, अवामी अ‍ॅक्शन कमिटीचे नेते शौकत नवाज मीर म्हणाले, “आमचं आंदोलन कोणत्याही संस्थेविरोधात नाही, तर आमच्या मौलिक हक्कांसाठी आहे. गेल्या 70 वर्षांपासून आमच्या लोकांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवलं जात आहे. आता मात्र पुरे झालं. आमचे अधिकार द्या, अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जा. आमचा संघर्ष 1947 पासून आम्हाला नाकारण्यात आलेल्या मूलभूत अधिकारांसाठी आहे.पाकिस्तान सरकार पीओकेकडे वसाहतवादसारखं पाहते, एकसमान अधिकार असलेल्या भागासारखं नाही.”

पीओके मधील आंदोलनाचे व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. हे पाहता पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ सरकारने या आंदोलनावर नियंत्रण मिळवण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लावले आहे. हजारो लष्करी जवान रस्त्यांवर तैनात करण्यात आले आहेत. हे आंदोलन रविवार रात्रीपासूनच उग्र रूप धारण करत आहे, त्यामुळे परिस्थिती बिघडू नये म्हणून सरकारने इंटरनेट सेवा तात्पुरती बंद केली आहे. काही भागांत मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दल तैनात केले आहेत. इस्लामाबादहून अतिरिक्त फोर्स बोलावण्यात आली आहे. मुजफ्फराबादसारख्या शहरांमध्ये प्रवेश व निर्गमनाच्या मार्गांवर अडथळे लावण्यात आले आहेत.

—————

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode

You Might Also Like

स्पेनमध्ये इच्छामरण: प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर महिलेचा जीवनत्याग
पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर इराणचा भारताला मोठा संदेश
इराणमधील अनेक शहरांमध्ये हिंसक निदर्शने सुरूच; आतापर्यंत २००० लोकांचा मृत्यू
रशियन गॅसवर २०२७ पर्यंत पूर्णपणे बंदी घालण्याचा युरोपियन युनियनचा निर्णय
दक्षिण कोरिया: सोल प्लाझाजवळील इमारतीला आग; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात आले

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article पूरग्रस्तापर्यंत शासकीय मदत पोहोचवण्याची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणेची – जयकुमार गोरे
Next Article लेहमध्ये सहाव्या दिवशीही संचारबंदी; उपराज्यपालांची सुरक्षा परिस्थितीचा घेतला आढावा
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?