cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > International > पाक हल्ल्यानंतर अफगाणिस्तानचा लष्करप्रमुख जनरल मुनीर यांना कठोर प्रत्युत्तर देण्याचा इशारा
International

पाक हल्ल्यानंतर अफगाणिस्तानचा लष्करप्रमुख जनरल मुनीर यांना कठोर प्रत्युत्तर देण्याचा इशारा

CliQ INDIA
Last updated: February 23, 2026 6:34 am
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE

काबुल , 22 फेब्रुवारी (हिं.स.)।अफगाणिस्तानवर पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात किमान 20 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अफगाणी माध्यमे आणि सुरक्षा सूत्रांच्या माहितीनुसार आतापर्यंत 18 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून बचावकार्य अद्याप सुरू आहे. या एअर स्ट्राइकनंतर अफगाणिस्तानात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. अफगाणिस्तानने महिलां-मुलांच्या हत्येचा आरोप करत पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल मुनीर यांना कठोर प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे.

इस्लामिक एमिरेट ऑफ अफगाणिस्तान (तालिबान सरकार) चे प्रवक्ते जबिहुल्ला मुजाहिद यांनी पाकिस्तानने नंगरहार आणि पक्तिका प्रांतांवर केलेल्या हवाई हल्ल्यांवर तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, पाकिस्तानातील जनरल आपल्या देशातील अंतर्गत सुरक्षा कमकुवतपणा लपवण्यासाठी महिलां आणि मुलांना लक्ष्य करत आहेत. मुजाहिद यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत म्हटले की, “पाकिस्तानी जनरल आपल्या देशातील सुरक्षा त्रुटींची भरपाई अशा गुन्ह्यांद्वारे करण्याचा प्रयत्न करत आहेत.”

अफगाणिस्तानच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानी सैन्याने अफगाण हद्दीत घुसखोरी करून नागरिकांवर हल्ला केला. नंगरहार प्रांतातील बेहसूद जिल्ह्यातील एका नागरिकाच्या घराला लक्ष्य करण्यात आले, जिथे एकाच कुटुंबातील 23 सदस्य ढिगाऱ्याखाली अडकले. मृतांमध्ये किमान 12 लहान मुले आणि किशोरवयीन मुलांचा समावेश आहे. नंगरहार आणि पक्तिका प्रांतांत एकूण डझनावारी नागरिक ठार आणि जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. पक्तिका प्रांतातील बेरमाल येथे असलेल्या एका धार्मिक मदरशालाही या हल्ल्यात फटका बसल्याची माहिती आहे.

दरम्यान पाकिस्तानने या हल्ल्यांची कबुली दिली असून ते “गुप्त माहितीवर आधारित निवडक कारवाई” असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, या कारवायांमध्ये तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) आणि इस्लामिक राज्य – खोरासान प्रांत (आयएसकेपी) यांच्या सात ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. हे हल्ले अफगाणिस्तानातून कार्यरत दहशतवादी गटांवर केंद्रित होते, असा दावा पाकिस्तानने केला आहे.तर अफगाण संरक्षण मंत्रालयाने या कारवाईचा तीव्र निषेध करत हा अफगाण सार्वभौमत्वाचा उघड भंग असल्याचे म्हटले आहे. त्यांनी “योग्य वेळी मोजून मापून प्रत्युत्तर दिले जाईल” असा इशाराही दिला आहे.

हे हल्ले पाकिस्तानमध्ये अलीकडे झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यात इस्लामाबादमधील शिया मशिदीवरील हल्ल्याचाही समावेश असून त्यात डझनावारी लोकांचा मृत्यू झाला होता.

ऑक्टोबर 2025 मधील सीमावादातील संघर्षानंतर, ज्यात 70 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता, दोन्ही देशांतील तणाव वाढलेला आहे. या ताज्या घटनेमुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा एकदा तीव्र झाला आहे.

—————

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode

You Might Also Like

एलॉन मस्कची पुन्हा एकदा ट्रम्पवर अप्रत्यक्ष टीका | BulletsIn
हिजबुल्लाहवर हल्ले सुरूच राहतील- बेंजामिन नेतन्याहू
टेक्सासमध्ये पेट्रोल पंपावर भारतीय विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या व्यक्तीला अटक
ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स राज्यात बंदुकींचे कायदे केले कडक
वाढत्या प्रादेशिक संघर्षात इराणची शेजाऱ्यांकडे माफी, अमेरिकेची ‘बिनशर्त शरणागती’ची मागणी फेटाळली

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article पुण्यात एकाच वेळी ४२ ठिकाणी जल स्वच्छता मोहीम संपन्न
Next Article काँग्रेसने एआय इम्पॅक्ट समिटला घाणेरड्या राजकारणाचे व्यासपीठ बनवले : पंतप्रधान
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?