cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > International > डगमगणाऱ्या जगाला भारतच मार्ग दाखवेल- मोहन भागवत
International

डगमगणाऱ्या जगाला भारतच मार्ग दाखवेल- मोहन भागवत

CliQ INDIA
Last updated: November 25, 2023 5:30 am
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE

सांस्कृतिकदृष्ट्या जगाला जोडण्याचे केले आवाहन

थायलंडमध्ये तिसऱ्या जागतिक हिंदू काँग्रेसचा शुभारंभ

बँकॉक, 24 नोव्हेंबर (हिं.स.) : जगाने आजवर भौतिकवाद, साम्यवाद आणि भांडवलशाहीच्या प्रयोगाचा अनुभव घेतला. परंतु, त्यानंतरही अस्वस्थतेने जग डगमगते आहे. या डगमगणाऱ्या जगाला आनंद आणि समाधानाचा मार्ग भारत दाखवेल असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. ते आज, शुक्रवारी थायलंडची राजधानी असलेल्या बँकॉक येथे आयोजित तिसऱ्या विश्व हिंदू काँग्रेसच्या उद्घाटन सत्रात बोलत होते.

जागतिक हिंदू काँग्रेस दर 4 वर्षांनी आयोजित केली जाते. यावेळी वर्ल्ड हिंदू फाउंडेशनने थायलंडची राजधानी बँकॉक येथे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 24 नोव्हेंबरपासून सुरू झालेला हा कार्यक्रम रविवार, 26 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. या कार्यक्रमाच्या शुभारंभ सत्रात आज, शुक्रवारी सरसंघचालक म्हणाले की, आनंद आणि शांती मिळावी म्हणून जगाने गेल्या 2 हजार वर्षापासून भौतिकवाद, भांडवलशाही आणि साम्यवादाचे प्रयोग केलेत. परंतु, त्यानंतरही जग डगमगत आहे, चाचपडत आहे. त्यांनी अनेक धर्मांशी संबंधित प्रयोगही केले. त्यांना भौतिक समृद्धी मिळाली. मात्र, समाधान मिळाले नाही. आता कोरोना साथरोगानंतर जगाने यावर पुनर्विचार करायला सुरुवात केली आहे. आता, भारतच मार्ग दाखवेल यावर त्यांचे एकमत झाल्यासारखे वाटत आहे. आपल्याला सर्वांशी संपर्क साधावा लागेल आणि त्यांना आपल्या सेवांच्या माध्यमाने आमच्याकडे आणावे लागेल. आपल्याकडे उत्साह आहे. निःस्वार्थ सेवेसाठी आपण जगात अग्रेसर आहोत. हे आपल्या परंपरा आणि मूल्यांमध्ये आहे. यामुळे लोकांपर्यंत पोहोचा आणि त्यांची मने जिंका’ असेही आवाहन डॉ. भागवत यांनी केले.

हिंदू परंपरांमध्ये काही मतभेद असू शकतात. परंतु, आपण सर्वत्र जातो, प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो, काही लोक सहमत असतात आणि काही नाही, मात्र, आपण सर्वांशी जोळवून घेतो असे सरसंघचालकांनी सागंतले. यावेळी डॉ. भागवतांनी सांगितले की, धर्माच्या विजयावर आमचा विश्वास आहे. यावर आपला धर्म अवलंबून आहे. ही प्रक्रिया धर्माच्या नियमांवर आधारित आहे आणि परिणामी धर्म आपल्यासाठी कर्तव्य बनतो. ‘आम्ही धन विजय आणि आसुरी विजय अनुभवला आहे. पैसा जिंकणे म्हणजे वस्तूंमधून मिळणारा आनंद, पण यात हेतू बरोबर नाही. हे आत्मकेंद्रित असल्यासारखे आहे. देशाने (ब्रिटिशांचा) 250 वर्षे संपत्तीचा विजय पाहिला. आसुरी विजय म्हणजे इतर समुदायांप्रति आक्रमकतेची भावना असणे. परकीय आक्रमकांनी भारतात 5200 वर्षे राज्य केले. यामुळे आमच्या भूमीवर नासधूस झाल्याचे सरसंघचालकांनी यावेळी नमूद केले.

तिसऱ्या जागतिक हिंदू काँग्रेस परिषदेची संकल्पना ‘जयस्य आयतनं धर्म:’ अशी ठेवण्यात आली आहे. त्याचा अर्थ- ‘धर्म, विजयाचा आधार.’ ही परिषद 26 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. यामध्ये हिंदूंच्या कर्तृत्वासोबत जगातील अनेक क्षेत्रांत हिंदूंवर होत असलेले भेदभाव, अत्याचार आणि त्यांना सामोरे जाण्याचे मार्ग यावरही चर्चा होणार आहे. पहिली जागतिक हिंदू काँग्रेस 2014 मध्ये दिल्लीत आयोजित करण्यात आली होती आणि दुसरी परिषद शिकागो, यूएसए येथे 2018 मध्ये आयोजित करण्यात आली होती. कोरोना कालावधीमुळे तिसरा कार्यक्रम लांबला. वर्ल्ड हिंदू फाउंडेशनने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

EU मतदानापूर्वी ग्रीसमध्ये राजकीय स्पॅम घोटाळ्याचा उद्रेक झाला
कराचीमध्ये सिलेंडरच्या स्फोटानंतर तीन मजली इमारत कोसळली, १६ जणांचा मृत्यू
महत्वपूर्ण संशोधनाने इंग्लंड आणि वेल्समध्ये गंभीर हिंसेची कमी योग्यात केली जाहीर
ट्रम्प यांनी कॉफी, मांस आणि इतर मूलभूत अन्नपदार्थांवरील शुल्क उठवले
ट्रम्प यांची बजेटमध्ये कपात, 2145 वैज्ञानिक ‘नासा’मधून पडले बाहेर

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article ‘महिलांवरील हिंसाचाराचे निराकरण’ चर्चासत्राचे आयोजन
Next Article भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात महाराष्ट्रातील स्थानिक उत्पादनांची जोरदार मागणी
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?