ब्रुसेल्स, 17 जुलै, (हिं.स.) बेल्जियमच्या
बूम शहरात दरवर्षी आयोजित केला जाणारा प्रसिद्ध टुमारोलँड इलेक्ट्रॉनिक संगीत
महोत्सव यावेळी अडचणीत सापडला आहे. १८ जुलै रोजी महोत्सव सुरू होण्यापूर्वी मुख्य
मंचावर भीषण आग लागली.आग स्टेजच्या उजव्या बाजूने सुरू झाली आणि काही
क्षणातच संपूर्ण स्टेजला वेढून टाकले.स्थानिकांनी
फटाक्यांसारखे आवाज ऐकले होते. पण आगीचे खरे कारण अजून निश्चित झालेले नाही.
आग
लागली त्यावेळी कोणीही प्रेक्षक उपस्थित नव्हते. पण एक हजार लोक या संगीत महोत्सवाच्या
तयारीत व्यस्त होते.टुमारोलँडच्या प्रवक्त्या डेबी विलेमसेन म्हणाल्या, आमची पहिली प्राथमिकता सुरक्षितता आहे.
आपत्कालीन सेवा घटनास्थळी उपस्थित आहेत आणि परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.
सध्याया
अपघातात कोणी जखमी झाले आहे की, नाही हे स्पष्ट नाही. पण आयोजकांकडून कोणतीही अधिक माहिती
देण्यात आलेली नाही.
टुमारोलँड महोत्सवाची या वर्षीची थीम ‘द वर्ल्ड ऑफ ऑर्बीझ’ आहे आणि त्यानुसार मुख्य स्टेज
सजवण्यात आला होता. पण आता आगीत मोठ्या प्रमाणात तो जळाला आहे. टुमारोलँड
कार्यक्रमात आग लागण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०१७ मध्ये, स्पेनमधील बार्सिलोना येथे टुमारोलँड
युनायटेड फेस्टिव्हल दरम्यान स्टेजला आग लागली होती. या आगीनंतर २२ हजार संगीतप्रेमींना घाईघाईने बाहेर काढावे लागले
होते.
—————
हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra
