cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Entertainment > 'तुजं माजं सपान' मालिकेच्या सेटवर रक्तदान शिबिराचे आयोजन
Entertainment

'तुजं माजं सपान' मालिकेच्या सेटवर रक्तदान शिबिराचे आयोजन

CliQ INDIA
Last updated: January 24, 2024 10:00 pm
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 24 जानेवारी (हिं.स.) एका वेगळ्या धाटणीची कलाकृती व त्यातून जपली जाणारी सामाजिक आणि कौटुंबिक बांधिलकी यांचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘तुजं माजं सपान’ ही सोनी मराठीवरील मालिका. प्रेक्षकांनी उचलून धरलेली ही गावाकडची गोष्ट त्यांना आपलीशी वाटण्याचं कारणच मुळात त्याच्या विषयात आहे. नावीन्यपूर्ण विषय आणि त्याला साजेशा कलाकारांची असलेली साथ, या मालिकेला उजवं ठरवते. मग ते कुठलंही क्षेत्र असो स्त्रिया आपली आवड आणि कर्तव्य यांची सांगड अगदी लीलया घालताना दिसतात. वेटक्लाऊड या निर्मितिसंस्थेच्या सोनी मराठी वाहिनीवरील ‘तुजं माजं सपान’ ही मालिका हीच बाब अधोरेखित करते आहे. सामान्य घरातील प्राजक्ताला रांगड्या मर्दानी खेळाचं, कुस्तीचं पडलेलं स्वप्नं आणि तिला पैलवान वीरूची असलेली भक्कम साथ यांची अनोखी कथा. सोम. ते शनि. संध्या. ७.०० वा., ‘तुजं माजं सपान’ या मालिकेमधून आपल्याला पाहायला मिळते आहे.

‘तुजं माजं सपान’ मालिकेने २०० भागांचा टप्पा पार केला आहे. वीरू आणि प्राजक्ता यांच्या आजवरच्या प्रवासात फार अडचणी आल्या. पण त्यांनी एकत्र येऊन त्या अडचांनींचा सामना केला. आता मालिकेने २०० भागांचा टप्पा पार केला. मालिकेच्या सेटवर याबद्दल आगळेवेगळे सेलिब्रेशन करण्यात आले. सेटवरील सगळ्या मंडळींनी चक्क रक्तदान शिबिर आयोजित करून रक्तदान केले. प्राजक्ता आणि वीरू ह्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन रक्तदान केले आणि हा २०० भागांचा टप्पा साजरा केला. नाशिक येथील सेटवर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नाशिकमधील जनकल्याण रक्तकेंद्र, नाशिक या संस्थेबरोबर हे रक्तदान शिबिर पार पडले.

वीरू आणि प्राजक्ता यांचा एकत्रित प्रवास पुढे कशा प्रकारे असेल, हे आता मालिकेत पाहायला मिळणार आहे. वीरू आणि प्राजक्ता यांचा ‘तुजं माजं सपान’पासून दोघांच्या आपल्या सपानपर्यंतचा हा नवा प्रवास नक्कीच पाहण्याजोगा आहे आणि हे पाहणं अतिशय रंजक असणार आहे. ‘तुजं माजं सपान’ सोम. ते शनि. संध्याकाळी ७ वाजता, फक्त आणि फक्त सोनी मराठी वाहिनीवर.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

नवी मालिका निवेदिता माझी ताई लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
‘गोंधळ’ येत्या १४ नोव्हेंबरला होणार प्रदर्शित
राजपाल यादव कायदेशीर गोंधळाच्या पार्श्वभूमीवर यूट्यूब पदार्पणासह डिजिटल प्रकाशझोताकडे वळले
आज मी जी आहे ती वडिलांनी केलेल्या त्यागामुळेच आहे – हुमा कुरेशी
ठाण्यात 15 नोव्हेंबर रोजी आदिवासी सांस्कृतिक कला महोत्सवाचे आयोजन

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article अयोध्येत पहाटेपासून भाविकांची प्रचंड गर्दी
Next Article धवल सिंह मोहिते पाटील यांच्यासह काही जणांवर गुन्हा दाखल
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?