cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Entertainment > कलर्स मराठीवरील कलाकारांच्या दिवाळीच्या आठवणी आणि किस्से
Entertainment

कलर्स मराठीवरील कलाकारांच्या दिवाळीच्या आठवणी आणि किस्से

CliQ INDIA
Last updated: November 11, 2023 11:30 pm
CliQ INDIA
Share
5 Min Read
SHARE

मुंबई, 11 नोव्हेंबर (हिं.स.) : दिवाळी हा आत्मिक व सामाजिक साक्षरतेचं समर्थन करणारा सण आहे. धूप, दीप, रांगोळी व सजावट दिवाळीला अजून सुंदर बनवतात. सुंदर रांगोळी व दीपांची चमक हे आनंदात भर घालतात. कलर्स मराठीवरील लोकप्रिय कलाकार सांगत आहेत त्यांचे दिवाळीच्या आठवणी आणि किस्से.

कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ मालिकेत स्वामी समर्थांची भूमिका साकारणारे अक्षय मुडावदकर म्हणतात, दिवाळीच्या माझ्या आठवणी वेगवेगळ्या टप्प्यावर आहे. माझं बालपण नाशिकमध्ये गेलं. तिथली विशेष आठवण म्हणजे दिवाळीच्या सुट्टीत लपाछपी आणि क्रिकेट सारखे खेळ खेळून आम्ही खूप मजा करायचो. ह्या टप्प्यावर आमच्या कुटुंबात एक नवीन व्यक्तीचा परिचय झाला आहे, माझी पुतणी, मनू . जी आमची दिवाळी आणखी खास बनवते.ही दिवाळी खरोखरच खास असणार आहे कारण सर्वजण एकत्र असतील.

कलर्स मराठीवरील सिंधुताई माझी माई मालिकेत सिंधुताईंची भूमिका साकारणारी शिवानी सोनार म्हणते,माझी दिवाळीची आठवण अशी की, गेले ४-५ वर्ष कामामुळे दिवाळीला मी घरी नाही आहे फक्त लक्ष्मीपूजनाला मी घरी जाते. माझ्यासाठी किल्ला बनवणे ही खूप जवळची आठवण आहे. मी आणि माझा भाऊ लहानपणी किल्ला बनवून, त्यावर मावळे ठेवायचो. जेव्हा मी किल्ला बघते मला मनात असं वाटतं की मला पुन्हा किल्ला बनवायचा आहे कारण तो एक वेगळाच उत्साह आणि मजा आहे.

कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला मालिकेतील रत्नमाला म्हणजेच निवेदिता सराफ म्हणतात,आम्ही लहान असताना आई खाजाचे कानोले, लाडू चिवडा, बाळ फराळ असे स्वादिष्ट पदार्थ बनवत असे. लग्न झाल्यावर दिवाळीच्या वेळी सासरचे लोक माझ्या घरी येतात आणि आम्ही सगळे मिळून जेवतो. या वर्षी आम्ही आमच्या नातेवाईकांच्या घरी जाणार आहोत, तरीही मला हे सगळे दिवाळीचे पदार्थ बनवायला आवडतात. माझा मुलगा अनिकेत गेल्या काही वर्षांपासून दूर आहे आणि मुलांशिवाय सण साजरे करणे रिकामे वाटते. पण, आम्ही त्याच्यासोबत व्हिडिओ कॉल करतो आणि एकत्र दिवाळी फराळ करतो. मी त्याला दरवर्षी फराळ पाठवते. तसेच मी आणि अशोक, श्रद्धानंद महिला आश्रम आणि कुमुदबेन इंडस्ट्रियल होम फॉर ब्लाइंड मुलींना दिवाळीच्या फराळाचे वाटप देखील करतो. जे घरापासून दूर आहेत आणि एकटे साजरे करू शकत नाहीत त्यांना दिवाळीचा फराळ पुरवतो.

कलर्स मराठीवरील रमा राघव मालिकेतील रमा म्हणजेच ऐश्वर्या शेटे म्हणते,लहानपणी माझ्या कुटुंबात दिवाळीला तुळशीचं लग्न असायचं. सुरुवातीला आम्ही करत नव्हतो, पण शेजारी राहणाऱ्या माझ्या मावशीकडे तुळशीचा विवाह असायचा, म्हणून मी माझ्या आईलाही ते करायला पटवून दिलं. तेव्हापासून आम्ही दिवाळीला तुळशीविवाह मोठ्या उत्साहात साजरा करतो. दिवाळीचा एक किस्सा आहे, जेव्हा मला फटाक्यांची भीती वाटायची कारण कोणीतरी बटरफ्लाय लावला होता आणि तो माझ्या ड्रेसमध्ये शिरला. ही वाईट आठवण असूनही, हा एक मजेदार किस्सा आहे. दिवाळीच्या काळात मला माझ्या मित्रांना आणि भावंडांना भेटायला मजा येते आणि आम्ही खूप धमाल करतो.

कलर्स मराठीवरील रमा राघव मालिकेतील राघव म्हणजेच निखिल दामले म्हणतो,माझ्या आजीचा केटरिंगचा व्यवसाय होता त्यामुळे दिवाळी आली की हे सगळे पदार्थ बनवायला घेते. लहान असताना तिला मी, बाबा, आई मदत करायचो आणि सगळे मिळून फराळ बनवायचो. आता कामामुळे मी नसतो तेवढा घरी पण तरी आज्जी आई, बाबा आणि आत्याच्या मदतीने जेवढा जमेल तितका फराळ करत असते. खूप मजा येते आम्ही सगळे भेटतो सगळे घरी येतात.

कलर्स मराठीवरील पिरतीच वानवा उरी पेटला मालिकेतील सावित्री म्हणजेच रसिका वाखारकर म्हणते, दिवाळीबद्दलची माझी आवडती गोष्ट म्हणजे त्यातून मिळणारा विलक्षण उत्साह. वातावरण थंड होऊ लागते, वातावरण रम्य होते आणि रात्री सुंदर दिव्यांनी उजळून निघते. हे खूप रोमांचक आहे! दिवाळीचा विचार करते तेव्हा मला लहानपणी रांगोळ्या काढणे आणि किल्ले बनवल्याचे आठवते. जरी मी रांगोळ्या काढण्यात उत्तम नसले तरी माझी रांगोळी वेगळी दिसावी म्हणून मी वेगवेगळे रंग वापरत असे. मी दोन प्रकारच्या रांगोळ्या काढायचे – एक फुलांची आणि एक रंगांची. मी १०वी पूर्ण केल्यानंतर घरापासून दूर राहत असल्याने, आता दिवाळी म्हणजे खूप दिवसांनी कुटुंबाशी भेटणं आहे. दिवाळीत माझ्यासाठी हेच सर्वात महत्त्वाचं असतं.

कलर्स मराठीवरील पिरतीच वानवा उरी पेटला मालिकेतील अर्जुन म्हणजेच इंद्रनील कामत म्हणतो, दिवाळी म्हंटलं की मला सुट्ट्या, आजोळ, मामाचं शेत. ती १०-१२ दिवसांची मजा. लहानपणी आजी आम्हाला ओळीने बसवायची आणि चंदन उगळायला लावायची ती आमच्यासाठी एक स्पर्धाच असायची की कोण सकाळी लवकर उठेल आणि कोण अभ्यंग स्नान करेल ते ही चंदन उगाळून, उटणं लावून ही एक धमाल होती. लहानपणी मला असा वाटायचं की सगळे लोक फराळ बनवता आहेत तो आपल्याला फक्त बसून वारपायचा आहे. अजून एक आठवण किल्ला बनवायची. मला अजून ही प्रचंड आवड आहे किल्ला बनवायची पण आता वेळे अभावी जमत नाही. मी कामासाठी बाहेर मला घरच्यांना भेटता येत नाही पण दिवाळी माझ्यासाठी त्या जुन्या आठवनींना उजाळा देण्याचं काम करते. नातं जपण्याची संधी दिवाळी देते असा मला वाटतं.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

पलक तिवारी आई श्वेता आणि भावासोबत पोहचली शिर्डीला | BulletsIn
Sudipto Sen Breaks Silence on Threats and Exit from The Kerala Story 2, Reveals Bold Vision Behind ‘Charak: Fear of Faith’
रणवीर सिंग कंतारा मिमिक्री विवादात माफी मागतो: कर्नाटक उच्च न्यायालयाने अंडरटेकिंग स्वीकारली, अभिनेता चामुंडेश्वरी मंदिरात जाणार
''ध्रुव तारा''च्या आगामी भागांमध्ये महावीर – तारा यांच्या जीवनात भावनिक कल्लोळाचे संकेत
पंचपिटिका रहस्याच्या शोधात नेत्रा

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article रत्नागिरी : राज्यस्तरीय बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धेत परशुराम राऊत, श्रद्धा इंगळे विजेते
Next Article गिऱ्हाईक म्हणून सराफ दुकानी शिरल्या अन् सोन्याच्या बांगड्या ढापून शिताफीने पळाल्या
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?