cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Entertainment > ''ध्रुव तारा''च्या आगामी भागांमध्ये महावीर – तारा यांच्या जीवनात भावनिक कल्लोळाचे संकेत
Entertainment

''ध्रुव तारा''च्या आगामी भागांमध्ये महावीर – तारा यांच्या जीवनात भावनिक कल्लोळाचे संकेत

CliQ INDIA
Last updated: October 7, 2023 11:49 am
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE

मुंबई, ७ ऑक्टोबर, (हिं.स) सोनी सबवरील ध्रुव तारा – समय सदी से परे मालिकेचे वेधक कथानक आणि त्यात रोमान्स आणि टाइम ट्रॅव्हलची केलेली गुंफण व धक्कादायक ट्विस्ट आणि टर्न यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. इशान धवन आणि रिया शर्मा यांनी या मालिकेत अनुक्रमे नायक आणि तारा यांच्या भूमिका उत्तम साकारल्या आहेत, ज्यामुळे ही मालिका लोकप्रिय ठरली आहे. अलीकडेच प्रेक्षकांनी पाहिले की, महावीरला (कृष्ण भारद्वाज) नायकच्या ओळखीबद्दल शंका येते आणि त्याचे खरे उद्देश शोधून काढण्याच्या दिशेने तो पावले उचलू लागतो.

आगामी भागांमध्ये एकीकडे, महावीर नायकचे सत्य उघडकीस आणण्याच्या अगदी जवळ पोहोचेल, तर त्याच वेळी, ताराला हे समजते की, अलीकडे घडलेल्या सगळ्या रहस्यमय घाडामोडींच्या मागे डोके तिलोत्तमाचे(नेहा हरसोरा) आहे. तीच विश्वासघातकी आहे आणि सगळ्यांना नाचवते आहे. ही धक्कादायक गोष्ट तारा महावीरला सांगणारच असते, पण त्याचा आपल्या पत्नीवरचा अढळ विश्वास आड येतो व त्यामुळे त्याच्या आणि ताराच्या नात्यात वितुष्ट येते. महावीर नायकचे सत्य जाणून घेण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे आणि त्यात ताराने तिलोत्तमावर केलेले आरोप परिस्थिती आणखी गुंतागुंतीची करणार आहे. प्रेक्षकांना आगामी भागांमध्ये काही नागमोडी वळणांतून प्रवास करताना भावनांचे चढ-उतार अनुभवास येणार आहेत आणि ही वळणे तारा आणि महावीर यांच्या नात्यात कायमी स्वरूपी बदल घडवून आणू शकतील.

महावीरला पटवून देण्यात तारा यशस्वी होणार का? की, तिच्या खुलाशामुळे त्या दोघांचे संबंध कायमचे तुटणार?

ताराची भूमिका करणारी रिया शर्मा म्हणते, “तारासाठी आपल्या वडिलांच्या मृत्यूचे रहस्य उलगडणे हा एक अथक शोध आहे. शिवाय, महावीर या आपल्या प्रिय व्यक्तीपासून तिने नायकबद्दलचे मोठे गुपित लपवून ठेवले आहे. मला वाटते की, ध्रुव हा खरा गुन्हेगार नसून उलट त्याची पत्नी तिलोत्तमा दोषी आहे- हे महावीरला पटवून देणे हे तारासाठी एक मोठे आव्हान असेल. ही गोष्ट उलगडताना बघायला प्रेक्षकांना नक्की खूप मजा येईल.”

महावीरची भूमिका करत असलेला कृष्ण भारद्वाज म्हणतो, “मी साकारत असलेला महावीर आपल्या पत्नीवर- तिलोत्तमावर आंधळेपणाने विश्वास ठेवतो आणि तिच्याविषयी शंका घेणाऱ्याची तो पत्रास ठेवत नाही. आता ताराने तिलोत्तमावर आरोप केला आहे शिवाय नायकबद्दलचे मोठे गुपित महावीरपासून लपवून ठेवले आहे, त्यामुळे महावीरचा तारावरील विश्वास डळमळीत झाला आहे. कधी काळी ज्या बहीण-भावात आदर्श नाते होते, ते आता पार बदलून जाणार आहे आणि त्यात वितुष्ट येणार आहे. या तीव्र भावना माझ्या अभिनयातून दाखवणे हा माझ्यासाठी रोमांचक अनुभव असेल.”

बघा, ‘ध्रुव तारा – समय सदी से परे’ दर सोमवार ते शनिवार रात्री 8:00 वाजता फक्त सोनी सबवर!

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

पद्मश्री शंकर महादेवन संघाच्या कार्यक्रमात मुख्य अतिथी
यंदाचा झी चित्र गौरव महिलांनी गाजवला
मुनी रॉय कन्नस २०२६ साली सुरज नांबियार यांच्यापासून वेगळे झाल्यानंतर चर्चा निर्माण झाली.
विविध क्षेत्रातील मान्यवरांना 'ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया' पुरस्कार जाहीर
‘पुन्हा कर्तव्य आहे’ च्या सेटवर गणपतीचे होणार आगमन | BulletsIn

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article नागरी संरक्षण प्रशिक्षण महाविदयालयाच्या स्थापनेला झाली 60 वर्ष पूर्ण
Next Article संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजनेसाठी १,४९६ कोटी निधी वितरीत
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?