मुंबई, 21 सप्टेंबर (हिं.स.)।करीना कपूरचा आज(दि.२१) ४५वा वाढदिवस आहे. करीनाच्या वाढदिवसानिमित्त तिची बहीण करिश्मा कपूरने तिला एका खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहे.
करिश्माने आपल्या इंस्टाग्रामवर करीनासोबतचा एक जुना, गोंडस आणि आनंदाने भरलेला क्षण शेअर केला आणि त्यासोबत एक छोटी शुभेच्छा लिहिली. या छायाचित्रात करीना करिश्माला मागून मिठी मारत आहे आणि दोघीही चेहऱ्यावर गोड हास्य घेऊन कॅमेराकडे पाहत आहेत. ही सुंदर आठवण शेअर करताना करिश्माने लिहिले, “सर्वात छान बहीण, सर्वात चांगली मैत्रीण आणि त्याहूनही अधिक माझ्या सर्वात प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! मी तुझ्यावर खूप प्रेम करते.” यानंतर चाहत्यांनी आणि मित्र-मैत्रिणींनी या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव सुरू केला.
रिद्धिमा कपूर, भूमि पेडणेकर आणि इतर सेलिब्रिटींनी हार्ट इमोजी पोस्ट केले. करीना कपूरची नणंद सबा पटौदी हिनेही बेबोला एक गोंडस शुभेच्छा संदेश दिला. त्यांनी त्यांच्यासोबतच्या काही खास क्षणांचे फोटो शेअर करत लिहिलं, “बेबो जान – आपण एकत्र घालवलेल्या सगळ्या क्षणांसाठी… आपल्या खास पारंपरिक सेल्फीजसाठी!”
गेल्या वर्षी करीना कपूर ‘सिंघम अगेन’मध्ये झळकली होती.
त्यानंतर ती ‘क्रू’ या चित्रपटातही लीड रोलमध्ये होती, ज्याने बॉक्स ऑफिसवर १०० कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. या सिनेमात करीनासोबत तब्बू आणि कृति सेनन सुद्धा मुख्य भूमिकेत होत्या. विशेष म्हणजे या चित्रपटात कोणताही मोठा पुरुष सुपरस्टार नव्हता, तरीही केवळ दमदार कथेमुळे हा सिनेमा हिट ठरला होता.
—————
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode
