cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Entertainment > ‘आतुर’ चित्रपटातला ‘तो’ सीन माझ्यासाठी सर्वात कठीण – प्रीती मल्लापुरकर
Entertainment

‘आतुर’ चित्रपटातला ‘तो’ सीन माझ्यासाठी सर्वात कठीण – प्रीती मल्लापुरकर

CliQ INDIA
Last updated: October 17, 2023 4:47 pm
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE

मुंबई, 17 ऑक्टोबर : राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी दिग्दर्शित केलेला ‘आतुर’ हा चित्रपट ३ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाचं पहिलं पोस्टर ११ ऑक्टोबर रोजी लाँच झालं आणि तो थिएटरमध्ये जाऊन पाहण्यासाठी तमाम मराठी चित्रपट रसिक खऱ्या अर्थानं आतुर झाले आहेत. या पोस्टरमध्ये लक्षवेधी ठरतेय ती अभिनेत्री प्रीती मल्लापुरकर यांची व्यक्तीरेखा! याच व्यक्तिरेखेभोवती चित्रपटाचं कथानक फिरत असणार, हे पोस्टरवरून सहज स्पष्ट होतंय. हीच व्यक्तीरेखा व ‘आतुर’च्या चित्रीकरणाचा अनुभव याबाबत प्रीती मल्लापुरकर यांच्याशी साधलेला संवाद.

Contents
‘आतुर’चा अनुभव कसा होता?‘आतुर’साठी काही वर्कशॉप्स घेतले होते का?‘आतुर’च्या सेटवरचं वातावरण कसं होतं?तुमच्या सहकलाकारांसोबतचा अनुभव कसा होता? विशेषत: योगेश सोमण?चिन्मय उदगीरकर, प्रणव रावराणे यांचा सेटवरचा वावर कसा होता?चित्रीकरणानंतर तुमचा इतर कलाकारांशी संपर्क कसा आहे?चित्रीकरणावेळी घडलेली काही विशिष्ट आठवण आहे का?

‘आतुर’चा अनुभव कसा होता?

‘आतुर’चा अनुभव माझ्यासाठी खूप छान होता. खरंतर दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकाकडे काम करण्याची संधी मिळतेय यावर सुरुवातीचे काही दिवस विश्वासच बसत नव्हता. पण हळूहळू ते सत्यात उतरलं! शिवाजी लोटन पाटील सरांची दिग्दर्शन करण्याची पद्धत वेगळी आहे. ते स्वत: खूप स्पष्ट असतात की त्यांना सीन कसा शूट करायचा आहे. सगळ्यात विशेष म्हणजे ते तुम्हाला स्पष्टपणे सांगतात की एक कलाकार म्हणून तुम्ही तो सीन कसा करायचा आहे. त्यानंतर ते तुम्हाला तुमच्या स्टाईलनुसार अभिनय करू देतात.

‘आतुर’साठी काही वर्कशॉप्स घेतले होते का?

शिवाजी सरांची आणखी एक खासियत म्हणजे हल्ली सगळीकडे प्रचलित असणाऱ्या वर्कशॉप्सवर त्यांचा विश्वास नाही. ते कलाकाराच्या नैसर्गिक अभिनयावर विश्वास ठेवतात. त्यामुळे कलाकारांनाही त्यांच्या नैसर्गिक स्टाईलनुसार अभिनयात सर्वस्व झोकून काम करता येतं.

‘आतुर’च्या सेटवरचं वातावरण कसं होतं?

सेटवरचं वातावरण खूप छान होतं. ते मजेशीर होतं असं मी म्हणणार नाही. कारण अर्थात, तिथे सगळे काम करायलाच आले होते. त्यामुळे वातावरण पूर्णपणे चित्रपटाशीच निगडित होतं. पण, सेटवर तणाव नव्हता. पूर्ण टीम मदत करणारी होती.

तुमच्या सहकलाकारांसोबतचा अनुभव कसा होता? विशेषत: योगेश सोमण?

मी त्या सगळ्यांना सेटवरच भेटले. सगळे अनुभवी कलाकार आहेत. पण मला असं कुणी वाटू दिलं नाही की मी त्यांच्याएवढी अनुभवी नाहीये. कलाकार म्हणून प्रत्येक कलाकार वेगळाच असतो. पण प्रत्येकाकडून मला काहीतरी शिकायला मिळालं. योगेश सोमण हे तर परफेक्शनिस्ट आहेत.

चिन्मय उदगीरकर, प्रणव रावराणे यांचा सेटवरचा वावर कसा होता?

चिन्मय सेटवर एका कोपऱ्यात जाऊन बसायचा. तो शांत आहे, पण आम्ही खूप गप्पा मारल्या. त्याच्या अगदी उलट प्रणव रावराणे..तो सगळ्यात बडबड्या . कदाचित माझ्यापेक्षाही जास्त! माझे प्रणवबरोबर सीन्स नव्हते. पण आम्ही सेटवर भरपूर गप्पा मारल्या.

चित्रीकरणानंतर तुमचा इतर कलाकारांशी संपर्क कसा आहे?

खरं सांगायचं तर चित्रीकरण संपल्यापासून आम्ही अजून एकमेकांना भेटलेलो नाही आहोत. पण या सगळ्यांसोबत पुन्हा काम करायला मला नक्कीच आवडेल. मराठी सिनेमा क्षेत्रात आणखीन काही प्रोजेक्ट्स करण्याची माझी इच्छा आहे.

चित्रीकरणावेळी घडलेली काही विशिष्ट आठवण आहे का?

विशेष आठवण म्हणजे आमचा एक सीन आम्ही सगळ्यात शेवटी शूट केला होता. त्या सीनमध्ये मला उंचावरून खाली पडायचं होतं. तो भाग खूप उंचावर होता. उतारपण चांगलाच तीव्र होता. मी किमान २२-२३ वेळा वरून खाली पडले असेन. तुम्ही प्रत्यक्षात चित्रपटात पाहाल तर तो सीन फक्त काही सेकंदांचाच आहे. देवाच्या कृपेनं त्यात मला काही इजा झाली नाही. पण तो माझ्यासाठी चित्रपटातला सर्वात कठीण सीन होता.

You Might Also Like

बिग बॉस 16 च्या अब्दू रोजिकने लग्न केले, समारंभाची खास झलक शेअर केली
'डिलिव्हरी बॉय'चे पहिले पोस्टर भेटीला
ऍक्शनपॅक्ड 'क्लब 52' चित्रपटाचा धमाकेदार टीजर
‘कॉन्स्टेबल मंजू’ मध्ये होणार अभिनेते मिलिंद शिंदे यांची जबरदस्त एंट्री
मुक्ता बर्वे-प्रिया बापटचा ‘असंभव’ हॉरर सिनेमाचा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article उड्डाणपूल कोसळणं ही दुर्दैवी घटना; अहवालानंतर दोषींवर कारवाई – रविंद्र चव्हाण
Next Article १९ ऑक्टोबरला रंगणार नाट्य परिषदेच्या एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?