मराठी चित्रपटसृष्टीत आशयसंपन्न चित्रपट मोठ्या प्रमाणात निर्माण होतात, पण धडाकेबाज अॅक्शनपट तुलनेने कमी असतात. हीच उणीव भरून काढण्यासाठी ‘गौरीशंकर’ हा अॅक्शनपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा धडाकेबाज टीझर नुकताच लाँच झाला असून, चित्रपट २८ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
BulletsIn
- निर्मिती: मुव्हीरूट प्रॉडक्शन्स आणि ऑरेंज प्रॉडक्शन्सच्या सहकार्याने विशाल प्रदीप संपत यांनी निर्मिती केली आहे.
- दिग्दर्शन आणि संकल्पना: हरेकृष्ण गौडा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि संकल्पना साकारली आहे.
- मुख्य कलाकार: हरेकृष्ण गौडा, कविता वसानी, दक्षिणा राठोड, राहुल जगताप, सुशील भोसले, संकेत कोळंबकर आदी कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
- संगीत: प्रशांत आणि निशांत यांनी संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी घेतली आहे.
- छायांकन: रोशन खडगी यांनी चित्रपटाचे छायांकन केले आहे.
- गीतलेखन: संकेत कोळंबकर यांनी चित्रपटातील गीते लिहिली आहेत.
- संपादन: अमित जावळकर यांनी संकलनाची जबाबदारी सांभाळली आहे.
- अॅक्शन: चित्रपटातील दमदार अॅक्शन दृश्यांसाठी राशिद मेहता यांनी काम केले आहे.
- कला दिग्दर्शन आणि वेशभूषा: अमित चिंचघरकर यांनी कला दिग्दर्शन, तर नितिन दांडेकर आणि धनश्री साळेकर यांनी वेशभूषा डिझाइन केली आहे.
- टॅगलाईन: ‘प्रेमात हरला नाही, प्रतिशोधाने थांबला नाही – तोच आहे ‘गौरीशंकर”
