मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अंकुश चौधरी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याचा आगामी चित्रपट ‘पी.एस.आय. अर्जुन’ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या चित्रपटात अंकुश पहिल्यांदाच पोलिसाच्या भूमिकेत झळकणार आहे. नुकतेच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. चित्रपटाचे पोस्टर, अंकुशचा रुबाबदार पोलीस लूक, आणि मराठमोळ्या अभिनेता रितेश देशमुखचा मिळालेला पाठींबा यामुळे ‘पी.एस.आय अर्जुन’ने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
BulletsIn
-
अंकुश चौधरीचा आगामी चित्रपट ‘पी.एस.आय. अर्जुन’चे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले.
-
दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर अंकुश मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.
-
या चित्रपटात तो पहिल्यांदाच पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे.
-
अंकुशचा रुबाबदार पोलीस लूक आणि स्टाईलमुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे.
-
चित्रपटाच्या पोस्टरने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण केला आहे.
-
अभिनेता रितेश देशमुखने इंस्टाग्रामवर कमेंट करत अंकुशला शुभेच्छा दिल्या.
-
रितेशच्या या पाठिंब्यामुळे चित्रपटाविषयी आणखी उत्सुकता वाढली आहे.
-
चित्रपटाला चाहत्यांसोबतच इंडस्ट्रीतील कलाकारांचाही सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे.
-
‘पी.एस.आय. अर्जुन’ चित्रपट ९ मे २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.
-
चित्रपटाचे दिग्दर्शन भूषण पटेल यांनी केले असून, निर्माते विक्रम शंकर आणि ध्रुव दास आहेत.
