सुप्रसिद्ध अकॉर्डियन वादक, कुशल संगीत संयोजक आणि प्रतिभाशाली संगीतकार स्व. अरुण पौडवाल यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा “कृतज्ञता गौरव पुरस्कार” यंदा ज्येष्ठ पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांना जाहीर झाला आहे. संगीत क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ आणि समृद्ध प्रवास, तसेच त्यांच्या गायकीमधील योगदानाची दखल म्हणून हा सन्मान देण्यात येत आहे. हा पुरस्कार सोहळा 10 मे रोजी खार (पश्चिम), मुंबई येथे, पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
BulletsIn
-
पुरस्काराचा उद्देश: स्व. अरुण पौडवाल यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी संगीत क्षेत्रातील नामवंत व्यक्तीला कृतज्ञता गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाते.
-
पुरस्कारप्राप्त: यंदाचा 28 वा कृतज्ञता गौरव पुरस्कार सुप्रसिद्ध पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांना जाहीर झाला आहे.
-
पुरस्कार वितरण: 10 मे रोजी संध्याकाळी 7 वाजता, खार (पश्चिम), मुंबई येथील अनुराधा पौडवाल यांच्या निवासस्थानी हा समारंभ होणार आहे.
-
पुरस्काराचे स्वरूप: शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व रोख रु. 51,000/- इतके या पुरस्काराचे स्वरूप आहे.
-
पूर्वीचे पुरस्कारप्राप्त: राम कदम, यशवंत देव, प्रभाकर जोग, अरुण दाते, उल्हास बापट यांच्यासारख्या अनेक दिग्गजांना हा पुरस्कार मिळाला आहे.
-
उत्तरा केळकर यांचा शैक्षणिक व संगीत प्रवास: B.A. अर्थशास्त्रात पदवी आणि मुंबई विद्यापीठातून शास्त्रीय संगीताचा डिप्लोमा पूर्ण केला आहे.
-
गुरूजन: पं. फिरोज दस्तूर यांच्याकडून शास्त्रीय संगीत व यशवंत देव, श्रीकांत ठाकरे यांच्याकडून सुगम संगीताचे शिक्षण घेतले.
-
संगीत कारकिर्द: 53 वर्षांहून अधिक काळ, 12 भाषांमधील 425+ चित्रपट, 650+ कॅसेट्स/सीडी, जाहिराती व शॉर्ट फिल्मसाठी पार्श्वगायन.
-
गाजलेली गाणी: “सत्यम शिवम सुंदरा”, “झन झन नन छेडील्या तारा”, “गडद जांभळ भरलं आभाळ”, “कुणीतरी येणार ग”, अशा अनेक लोकप्रिय गाण्यांमध्ये त्यांचा आवाज अविस्मरणीय ठरला आहे.
-
प्राप्त पुरस्कार: महाराष्ट्र राज्य पुरस्कार (2 वेळा), मिया तानसेन पुरस्कार, कोकण रत्न, राम कदम पुरस्कार, महाराष्ट्र रत्न, इत्यादी अनेक सन्मान.
