मुंबई, १२ मार्च, :- ”सन नेटवर्क”च्या ”सन मराठी” वाहिनीवर ”कॉन्स्टेबल मंजू” ही नवीन मालिका १८ मार्च पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ही मालिका मंजिरी वाघमारे उर्फ मंजू आणि सत्या या दोन पात्रांवर आधारित आहे. तर अभिनेते महेश घाग हे इन्स्पेक्टर महेश जाधवच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
मालिकेविषयी अभिनेते महेश घाग म्हणतात, पुन्हा एकदा वर्दीतली भूमिका करतोय म्हणून मला खूप आनंद वाटतोय. शिवाय लोकांचाही खूप छान प्रतिसाद मिळत आहे. ही मालिका पाहण्यासाठी लोकही फार उत्सुक आहेत. लागीर झालं जी च्या टीम मधले बरेच जण या नवीन संचात सोबत आहेत आणि संपूर्ण टीम खूप चांगल्या उत्साहात काम करते आहे. काम करताना आम्ही खूप एन्जॉय करतो आणि असं करताना कलाकृती उत्तमच होते हा माझा अनुभव आहे. याशिवाय ही मालिका कुठल्याही मालिकेचा रिमेक नसून एक नवीन अस्सल गोष्ट आहे त्यामुळे ती फुलवत फुलवत काम करायला आणि प्रेक्षकांना नवीन अस्सल काहीतरी द्यायला आम्हाला नक्कीच आनंद होईल. भन्नाट गावरान तडका आणि तुमच्या आमच्यातली गोष्ट पाहायला लोकांना नक्कीच आवडेल. अनुभवी कलाकार आणि तंत्रज्ञान दिग्दर्शक यांच्यासोबत प्रेक्षकांच्या समोर आम्हाला नक्कीच काहीतरी अस्सल आणि भन्नाट सादर करता येईल या विचारानेच आम्ही सगळे खूप उत्सुक आहोत.
आता प्रतीक्षा १८ मार्च ची. प्रेक्षक ही आमची नवीन कलाकृती पाहून प्रतिसाद देतील त्यामुळे आम्हाला काम करण्यासाठी अजून उत्साह आणि बळ मिळेल.
संदीप जाधव निर्मित ””कॉन्स्टेबल मंजू”” या मालिकेत मोनिका राठी हिने मंजुची आणि वैभव कदम यांनी सत्याची भूमिका साकारली आहे. या मालिकेचे संवाद तेजपाल वाघ यांनी लिहिले असून स्वप्नील गांगुर्डे यांनी कथा, पटकथा लिहिली आहे. भिन्न स्वभावाची ही अनोखी प्रेम कहाणी नक्की पाहा सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता फक्त सन मराठी वाहिनीवर.
