cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Entertainment > 'सूर लागू दे' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
Entertainment

'सूर लागू दे' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

CliQ INDIA
Last updated: December 27, 2023 6:00 pm
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE

मुंबई, 27 डिसेंबर (हिं.स.) दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांचा ‘सूर लागू दे’ हा शेवटचा चित्रपट असल्याने कलाकारांपासून प्रेक्षकांपर्यंत सर्वांनाच या चित्रपटाबाबत कुतूहल आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला असून सोशल मीडियावर अल्पावधीत ‘सूर लागू दे’च्या ट्रेलरला तूफान प्रतिसाद मिळू लागला आहे. १२ जानेवारी २०२४ रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

आॅडबॅाल मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली निर्माते अभिषेक ‘किंग’ कुमार आणि नितीन उपाध्याय यांनी ‘सूर लागू दे’ या चित्रपटाची निर्मिती केली असून अश्विन पांचाळ या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. प्रवीण विजया एकनाथ बिर्जे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. पिकल एंटरटेन्मेंट स्टुडिओज हा चित्रपट महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वितरीत करणार आहे. या चित्रपटाचं लेखन आशिष देव यांनी केलं आहे. ‘सूर लागू दे’चा ट्रेलर पाहताक्षणीच लक्ष वेधून घेणारा आहे. चित्रपटात काय पाहायला मिळेल याची झलक ट्रेलरमध्ये दिसते. विक्रम गोखले आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी मुळ्ये या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच एकत्र आले आहेत. त्यांची केमिस्ट्री, अभिनयातील परीपक्वपणा आणि देवाणघेवाण ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. चित्रपटातील गाणीही सुरेख असून, अर्थपूर्ण संवाद उत्सुकता वाढवणारे आहेत. रीना मधुकर प्रमुख भूमिकेत असून त्यांनी टेलिव्हिजन आणि हिंदी, मराठी सिनेमातून उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत. मेघना नायडू यांची सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका आहे. यापूर्वी मराठीसाठी गाणं करणाऱ्या मेघनाने या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच भूमिका साकारली असून या चित्रपटात मेघना पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. एक अनमोल संदेश देणारा हा चित्रपट प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचं एक परिपूर्ण पॅकेज ठरणारा असल्याचं ट्रेलर पाहिल्यावर जाणवतं. याबाबत दिग्दर्शक प्रवीण बिर्जे म्हणाले की, या चित्रपटाचं कथानक कालातीत आहे. हे जगाच्या पाठीवर कुठेही घडू शकणारं असल्याने कोणत्याही प्रेक्षकाला हे आपलंसं करणारं आहे. यातील कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना अखेरपर्यंत खिळवून ठेवणारी असून, यातील श्रवणीय गीत-संगीत मन मोहून टाकणारं आहे. संगीतकार पंकज पडघन यांचं संगीत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करेल.

‘सूर लागू दे’ हा चित्रपट समाजात घडणाऱ्या घटनांचं प्रतिबिंब दाखवणारा आहे. मानवाने ठरवलं तर कर्माच्या बळावर तो नराचा नारायण होऊ शकतो. एखादी चांगली गोष्ट करताना वय केवळ आकडा बनून राहातं. आयुष्याच्या संध्याकाळीही इतरांसाठी प्रेरणादायी कार्य करण्याचा संदेश ‘सूर लागू दे’द्वारे सर्वदूर पोहोचणार आहे. विक्रम गोखले, सुहासिनी मुळ्ये, रीना मधुकर, मेघना नायडू यांच्यासह आशिष नेवाळकर, जयराज नायर, सुनील गोडबोले, सिद्धेश्वर झाडबुक्के, नितीन जाधव, आशा ज्ञाते, मेरू वेरणेकर, अनुराधा मोरे, शेखर शुक्ला, संदीप गायकवाड, हितेंद्र उपासनी, प्रदीप पटवर्धन, अस्लम वाडकर, सोमनाथ तळवलकर, सुनील जाधव, दीपिका गोलीपकर, अलका परब, अतुल गानोरकर, दिलीप कराडे, संदीप जयगडे, अमोघ चव्हाण, औदुंबर बाबर आदी कलाकारांच्याही चित्रपटात भूमिका आहेत.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

यामी गौतमचे क्रिती सॅननवरील टीकेच्या रीलला ‘लाइक’ करण्यावर स्पष्टीकरण: ‘चुकून झाले’; सोशल मीडियावरील टीकेला दिले उत्तर.
नानांची नाना रुपं, 'ओले आले' मध्ये रंगून गेले नाना
‘सितारे जमीन पर’च्या यशानंतर आमिर खान ‘महाभारत’वर आधारित चित्रपट आणणार
भीम भाष्य महामालिकेचा 14 वा भाग २६ नोव्हेंबर रोजी होणार प्रसारित
उज्जैनमधील महाकाल मंदिराला गायक मिका सिंग यांनी दिली भेट

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article देश सुरक्षित तर सगळे सुरक्षित : महंत कमलनयन
Next Article हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?