मुंबई, 18 जुलै (हिं.स.) ‘तुला जपणार आहे’ मालिकेत खूप काहीतरी मोठं घडणार आहे याची चाहूल देवी आजीच्या घरात प्रवेश करताच आली आहे, म्हणून देवीआजी मीराला व अंबिकाला एकत्र राहण्यास सांगतात. देवी आजी गेल्यावर, जेव्हा संपूर्ण कुटुंब पुजेची तयारी करतंय, तेव्हा वेदाला मायाच्या प्रभावाखाली समजत की अथर्व, मीरालाही अंबिकासारखं काहीतरी नुकसान करेल. भीतीच्या भावनेत ती सगळ्यांसमोर अथर्ववर आरोप करते की त्यानेच तिच्या आईला मारलंय आणि आता मीरालाही काही करेल. हे ऐकून मीरा खचते आणि अथर्व पूर्णपणे उद्ध्वस्त होतो. मंदिरात, मंजिरी पाऊल ठेवताच तिच्या शरीरावर वेदनादायक जखमा उमटायला लागतात हे सगळं अंबिकाच्या आणि मीराच्या शक्तीमुळे घडतंय. मर्जारी, मंजिरीला इशारा देते की जर ती कोणत्याही पवित्र विधीत सहभागी झाली, तर तिचं खरं रूप उघड होईल. यामुळे मंजिरीची भीती आणि घाई आणखी वाढते. तर दुसरीकडे मीराचं खच्चीकण होत तिच्यावर आरोप होतो कि तिने वेदा आणि अथर्वला वेगळं केलंय. पण अंबिका आता मीराच्या बाजूने आहे. ती मीराला बळ द्यायचा प्रयत्न करते. परिस्थिती काहीच बदल होत नसल्याचं पाहून अंबिका, मीरा समोर एक मोठं सत्य उघडकीस आहे. काय असेल हे सत्य ? जे ऐकून ऐकून मीराच्या पाय खालची जमीन सरकेल.
तेव्हा पाहायला विसरू नका उत्कंठा वाढवणारे भाग ‘तुला जपणार आहे’ दररोज रात्री १० :३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर. —————
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर
