मुंबई, २५ नोव्हेंबर, (हिं. स) झी मराठीच्या जाऊ बाई गावात या नव्या रिऍलिटी शो ने लोकांमध्ये उत्सुकता आणि कुतहुलता निर्माण केली आहे. पहिल्या प्रोमो पासून ते स्पर्धकांचे नव नवे प्रोमो ह्या सर्वांमुळेच प्रेक्षकांमध्ये ही उत्सुकता निर्माण केली आहे. कधी ना पहिला असा एक रिऍलिटी शो त्यांच्या भेटीस येणार आहे ज्याची ते अतुरतेने वाट पाहत असतानाच ”जाऊ बाई गावातच” शीर्षक गीताचं टीझर झी मराठीने आपल्या सोशल मीडियावर शेअर केल आहे. हार्दिक जोशीचा गावराण अंदाज ह्या टिझरमध्ये पाहायला मिळतोय. फक्त गाण्याच्या टीझरने इतकी खळबळ निर्माण केली आहे, तर काय होईल जेव्हा पूर्ण गाण्याचा विडिओ लोकांसमोर येईल. आता वाजणार अन गाजणार !!
प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा आणि मनोरंजनाची रंगतदार आतिषबाजी करणारा नवीन रिऍलिटी शो ‘जाऊ बाई गावात” आपल्या भेटीस येत आहे ४ डिसेंबर पासून सोमवार ते शनिवार रात्री ९:३० वाजता फक्त मराठीवर.
हिंदुस्थान समाचार
