मुंबई, 22 जानेवारी (हिं.स.) : एण्ड टीव्हीवर नुकतीच सुरू झालेली मालिका ‘अटल’मध्ये बाल कलाकार व्योम ठक्कर यंग अटलची भूमिका साकारत आहे. ही मालिका भारताचे दिग्गज पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या सुरूवातीला काळाला दाखवते. ३०० हून अधिक उमेदवारांच्या ऑडिशन्समधून निवडण्यात आलेल्या व्योमचे ५ डिसेंबर २०२३ पासून मालिका सुरू झाल्यापासून अद्वितीय अभिनयासाठी कौतुक करण्यात आले आहे. तो या भूमिकेप्रती अत्यंत समर्पित आहे, तो भूमिका निपुण होण्यासाठी सीन्स व संवादांचा सराव करताना भूमिकेच्या व्यक्तिमत्त्वाबाबत बारकाईने जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. या बालकलाकाराला अत्यंत आनंद झाला असून या नेत्याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी तो तितकाच उत्सुक देखील आहे. सिनेमागृहांमध्ये १९ जानेवारी रोजी प्रतिभावान अभिनेते पंकज त्रिपाठी अभिनीत चित्रपट ‘मैं अटल हूं’ प्रदर्शित होत असल्याने उत्साहित व्योमने त्याच्या पालकांसह या चित्रपटाचे पहिले स्क्रिनिंग पाहिले.
उत्साहित व्योम म्हणाला, ”मी माझ्या आई-वडिलांसोबत चित्रपट ‘मैं अटल हूं’ पाहायला गेलो आणि चित्रपट खूप उत्तम होता. एण्ड टीव्हीवरील मालिका ‘अटल’मध्ये यंग अटलची भूमिका साकारताना मला मालिकेचे शूटिंग सुरू होण्यापूर्वी त्यांच्या सुरूवातीच्या काळाबाबत व जीवनाबाबत बरेच काही समजले. एपिसोड्ससाठी शूटिंग करताना नेहमी त्यांच्याबाबत काहीतरी नवीन माहित पडते. आमच्या संशोधन टीमने अटलजींच्या बालपणीच्या गाथेबाबत लक्षवेधक माहिती सांगितली, जी अनेक लोकांना माहित नाही. पण लोकांना त्यांच्या राजकीय प्रवासाबाबत माहित आहे. माझ्या आईवडिलांनी देखील मला त्यांच्याबाबत रोचक तथ्ये व गाथा सांगितल्या. आमची मालिका त्यांच्या सुरूवातीच्या काळाबाबत न सांगण्यात आलेल्या गाथा सादर करण्याचा प्रयत्न करते.”
व्योम पुढे म्हणाला, ”श्री अटल बिहारी वाजपेयी यांचे असाधारण जीवन व राजकीय प्रवासाबाबत माहिती सांगणारा चित्रपट तयार करण्यात आल्याचे ऐकल्यापासून मी तो चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक होतो. यामुळे मला अटलजींबाबत, तसेच त्यांच्या अद्भुत योगदानाबाबत अधिक समजू शकेल. या चित्रपटाने मला या महान नेत्याच्या प्रवासाबाबत बहुमूल्य माहिती दिली आणि मला माझे आवडते कलाकार पंकज त्रिपाठी सर अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारताना पाहून खूप आनंद झाला. मी पंकज त्रिपाठीजींचा मोठा चाहता आहे आणि त्यांना कधीतरी व्यक्तिश: भेटण्याची माझी इच्छा आहे. ते प्रतिभावान कलाकार आहेत आणि मला त्यांचे चित्रपट व मालिका पाहायला आवडते. नेता ‘अटल’ यांच्या भूमिकेत त्यांना पडद्यावर पाहण्याचा अनुभव उत्साहवर्धक होता आणि मी चित्रपट पाहण्याचा आनंद घेतला. माझ्या मते, अटलजींची जीवनगाथा अत्यंत प्रेरणादायी आहे. बालक म्हणून मला या चित्रपटाने जाणीव करून दिली आहे की, तुम्ही तरूण असला तरी मोठे स्वप्न पाहू शकता आणि दयाळू व धाडसीपणा दाखवू शकता. मालिकेमध्ये मी साकारत असलेली भूमिका यंग अटल देखील दाखवून देतो की, महान नेत्यांनी देखील बालपणी दयाळूपणा दाखवत आणि मोठी स्वप्ने पाहत करिअरची सुरूवात केली. स्वत:वर विश्वास ठेवणे आणि आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे.
हिंदुस्थान समाचार
