cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Entertainment > इच्छाशक्ती आणि अध्यात्माशी सांगड घालणारा ‘देवघर ऑन रेंट’ चित्रपट
Entertainment

इच्छाशक्ती आणि अध्यात्माशी सांगड घालणारा ‘देवघर ऑन रेंट’ चित्रपट

CliQ INDIA
Last updated: September 5, 2025 6:30 am
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE
'देवघर ऑन रेंट' चित्रपटाचा ट्रीझर प्रदर्शीत

कोल्हापूर, 4 सप्टेंबर (हिं.स.) बेभानपणे जगताना आपल्या आतल्या आवाजाला आपण शरण गेलो तर आयुष्यातले सगळे मार्ग सोपे बनू शकतात. फक्त मार्ग निवडण्याची किंवा तो चुकलाच तर बदलण्याची आपली इच्छाशक्ती असली पाहिजे हा अध्यात्माशी सांगड घालणारा विचार ‘देवघर ऑन रेंट’मध्ये अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. हा चित्रपट हा चित्रपट २८ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

असंख्य गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या मुंबईतील चिंचपोकळीच्या श्री चिंतामणीच्या दरबारात ‘देवघर ऑन रेंट’ या आगामी मराठी चित्रपटाचा टिझर मोठ्या थाटात प्रदर्शित करण्यात आला आहे. या प्रसंगी चित्रपटातील कलावंत, निर्माते, दिग्दर्शक व तंत्रज्ञांची टिम उपस्थित होती. राधाकृष्ण प्रोडक्शनची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती पूनम चौधरी पाटील यांनी केली आहे. स्वरूप सावंत यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. कथालेखन स्वरूप सावंत, पूनम चौधरी पाटील, तर पटकथा व संवादलेखन संजय नवगिरे यांनी केले आहे. हा चित्रपट आध्यात्माची वर्तमानाशी सांगड घालणारा आहे.

चित्रपटाबाबत दिग्दर्शक स्वरूप सावंत म्हणाले की, आज सगळीकडे गणेशात्सवाचा जल्लोष आहे. ‘देवघर ऑन रेंट’ या चित्रपटाच्या शीर्षकातच देव दडला आहे. हा चित्रपट जरी आजची गोष्ट सांगणारा असला तरी यातील आध्यात्माचा धागा अतिशय महत्त्वाचा असल्याचे दिग्दर्शक स्वरूप सावंत यांनी स्पष्ट केले. आजच्या शर्यतीच्या जीवनात देवाचे अस्तित्व कोणीही नाकारू शकणार नाही. यातील शीर्षकाप्रमाणे आज जरी कोणी ‘देवघर ऑन रेंट’ असे म्हटले तरी देव मात्र त्याला क्षणभरही दूर लोटणार नाही. ‘चाले हे शरीर कोणाचीये, सत्ते कोण बोलविते हरिवीण.’ या संतवचनानुसार ती दैवी शक्ती गरीब असो, वा श्रीमंत सर्वांचा सांभाळ करते. ‘देवघर ऑन रेंट’ या चित्रपटात नाट्यमय कथानकासोबत मनोरंजनपर सर्व गोष्टी आहेत, ज्या प्रेक्षकांना अखेरपर्यंत खिळवून ठेवतील असे निर्मात्या पूनम चौधरी पाटील यांनी सांगितले.

या चित्रपटात निखिल चव्हाण, अंकित मोहन, भाऊ कदम, शशांक शेंडे, अश्विनी चावरे, वैभव चव्हाण, सुरेश विश्वकर्मा, अनिल नगरकर, चेतन रायकर, सिद्धेश्वर झाडबुके आणि गौतमी पाटील आदी कलाकार आहेत. चैतन्य साळुंखे यांनी छायाचित्रण केले असून, दिलीप कंधारे कला दिग्दर्शक आहेत. संगीतकार एस. सागर आणि कबीर शाक्य यांनी या चित्रपटातील गीतांना सुमधूर संगीत दिले आहे. नृत्य दिग्दर्शन किशोर दळवी यांनी केले असून विजय म्हस्के यांनी प्रॉडक्शन हेड म्हणून काम पाहिले आहे.

—————

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar

You Might Also Like

वर्गमंत्री वेब सीरिज ८ नोव्हेंबरपासून आपल्या भेटीला | BulletsIn
मुथैय्या मुरलीधरनचा चरित्रपट ठरला इफ्फी महोत्सवाचा एक महत्त्वाचा आकर्षण बिंदू
रामायण टीझर वाद: परदेशातील प्रदर्शनामुळे चाहत्यांचा रोष, सांस्कृतिक मालकीवरून चर्चा
गौरीशंकर चित्रपटाचे मोशन पोस्टर लॉन्च | BulletsIn
सुबोध भावे – तेजश्री प्रधानची केमिस्ट्री जुळणार ? | BulletsIn

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article डच प्रशिक्षक ओल्टमन्स पुन्हा भारतीय हॉकी संघासोबत काम करण्यास ईच्चुक
Next Article सोलापूर : देवरनिंबर्गीच्या सरपंचाचा गोळ्या झाडून खून
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?