मुंबई, 28 नोव्हेंबर, (हिं.स.)। मराठी मनोरंजन विश्वातून आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेता अक्षय वाघमारे दुसऱ्यांदा बाबा झाला असून, त्याच्या कुटुंबात एका गोंडस कन्येचे आगमन झाले आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या खास पोस्टद्वारे अक्षयने स्वतः ही माहिती दिली. “पोरगी झाली रे…!” असे कॅप्शन देत त्याने आपल्या आनंदाची भावना व्यक्त केली आहे.
अक्षय आणि पत्नी योगिता वाघमारे यांच्या घरी या छोट्या देवदूताचे आगमन होताच संपूर्ण कुटुंब आनंदात न्हाऊन निघाले आहे. नवजात बालिकेच्या आगमनाने घरात साऱ्यांच्याच चेहऱ्यावर आनंदाची लकेर दिसत असून, वाघमारे कुटुंबात सध्या उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
चाहत्यांकडून आणि उद्योगातील सहकाऱ्यांकडून अक्षय वाघमारेवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. कमेंट सेक्शनमध्ये प्रेम, आशीर्वाद आणि आनंदाच्या संदेशांनी भर पडत असून, या नव्या अध्यायासाठी चाहत्यांनी वाघमारे परिवाराला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
अक्षय वाघमारेच्या या आनंददायी बातमीने संपूर्ण मराठी सिनेविश्वात सध्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर
